राज्यसभेच्या १० जागांसाठी २४ जुलैला निवडणूक; एस.जयशंकर यांच्यासह ‘या’ नेत्यांचा कार्यकाळ संपणार!

जाणून घ्या निवडणुणकीचे सविस्तर वेळापत्रक

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  निवडणूक आयोगाने मंगळवारी (२७ जून) गुजरात, पश्चिम बंगाल आणि गोव्यातील राज्यसभेच्या दहा जागांवर होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीशी संबंधित माहिती जाहीर केली आहे. यानुसार २४ जुलै रोजी सर्व १० जागांवर मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणीही होणार असल्याची माहिती आयोगाने दिली आहे. Election for 10 Rajya Sabha seats on July 24

तीन राज्यांतील १० राज्यसभेच्या जागांचे सदस्य निवृत्त होणार आहेत. त्यामुळे या जागांवर निवडणूक होणार आहे. जाणून घेऊया त्या सदस्यांची नावे ज्यांचा कार्यकाळ जुलै आणि ऑगस्ट महिन्यात संपणार आहे.

या सदस्यांचा कार्यकाळ संपणार –

विनय तेंडुलकर (गोवा),  दिनेशचंद्र जेमलभाई अनावडिया (गुजरात), जुगलसिंग माथूर (गुजरात), एस जयशंकर (गुजरात), डेरेक ओब्रायन (पश्चिम बंगाल), डोला सेन (पश्चिम बंगाल), प्रदीप भट्टाचार्य (पश्चिम बंगाल), सुष्मिता देव (पश्चिम बंगाल), शांता छेत्री (पश्चिम बंगाल), सुखेंदू शेखर रे (पश्चिम बंगाल)

राज्यसभा निवडणुकीचे वेळापत्रक –

अधिसूचना जारी करण्याची तारीख – १३ जुलै, नावनोंदणीची अंतिम तारीख – १४ जुलै, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – १७ जुलै, मतदानाची तारीख – २४ जुलै, मतदानाची वेळ – सकाळी ९ ते दुपारी ४, मतमोजणीची तारीख – २४ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेपासून.

Election for 10 Rajya Sabha seats on July 24

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात