Election Commission : ईव्हीएमबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, आता उमेदवारांचे फोटो रंगीत होणार

Election Commission

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: Election Commission मतदारांसाठी निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. मतपत्रिकेवर आता उमेदवारांचे रंगीत छायाचित्रे असतील. उमेदवारांचे क्रमांक आणि फॉन्ट आकार मोठा असेल, ज्यामुळे मतदारांना ते वाचणे आणि पाहणे सोपे होईल.Election Commission

निवडणूक आयोग (ईसीआय) बिहार विधानसभा निवडणुकीपासून या उपक्रमाची सुरुवात करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार मतदारांची सोय आणि निवडणूक प्रक्रिया सुधारण्यासाठी गेल्या सहा महिन्यांत राबविण्यात आलेल्या २८ सुधारणांचा हा एक भाग आहे. ईव्हीएम मतपत्रिकेत सर्व उमेदवारांची नावे, निवडणूक चिन्हे आणि छायाचित्रे असतात. मतदार हे पाहून मतदान करतात.Election Commission



आयोगाने म्हटले आहे की,निवडणूक नियम, १९६१ च्या नियम ४९ब अंतर्गत, ईव्हीएम मतपत्रिकेच्या डिझाइन आणि छपाईसाठी विद्यमान मार्गदर्शक तत्त्वांमध्ये त्यांची स्पष्टता आणि वाचनीयता वाढविण्यासाठी सुधारणा करण्यात आल्या आहेत.

उमेदवार/नोटा क्रमांक आंतरराष्ट्रीय स्वरूपात भारतीय अंकांमध्ये (म्हणजे १, २, ३…) छापले जातील. स्पष्टतेसाठी, फॉन्ट आकार ३० आणि ठळक असेल. निवडणूक आयोगाच्या निवेदनानुसार, ईव्हीएम मतपत्रिका ७० जीएसएम कागदावर छापल्या जातील. विधानसभा निवडणुकीसाठी विशेष आरजीबी गुलाबी कागद वापरला जाईल. सर्व उमेदवार/नोटा नावे एकाच फॉन्ट प्रकारात आणि फाँट आकारात, मोठ्या अक्षरात छापली जातील.

Election Commission’s big decision regarding EVMs, now candidates’ photos will be in color

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात