प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये येण्यासाठी उत्सुक असण्यापेक्षाही ते काँग्रेसचे सल्लागार म्हणून काम करू इच्छितात. बाहेरून ते पक्षासाठी सल्लागार म्हणून काम करतील. Election 2024: Prashant Kishor retires in politics; Willing to come to Congress as an advisor; Will the old crooks in the party understand this?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काही महिन्यांपूर्वी झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकानंतर रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सन्यास घेणार असे जाहिर केले खरे मात्र ते राजकारणापासून लांब गेलेच नाहीत. शरद पवारांच्या भेटीनंतर ते राष्ट्रवादीत जाणार आसे वाटत असतांना आता त्यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. राहुल गांधींनी सकारात्मक सिग्नल दिला की त्यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित आहे .
राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि प्रशांत किशोर यांची नुकतीच एक बैठक पार पडली आहे. या बैठकीत सोनिया गांधी यादेखील व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे या बैठकीत सहभाग घेतला होता. प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये गेले तर त्यांना कोणती जबाबदारी दिली जाईल? याचीही चर्चा रंगली आहे. राहुल गांधी यांनी एक बैठक घेऊन प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये घ्यायचं काय याबाबत ज्येष्ठ नेत्यांचा सल्ला मागितला आहे असंही कळतं आहे.
संसदेत विरोधकांच्या एकजुटीसाठी राहुल गांधी यांचा पुढाकार; मात्र गदारोळाच्या प्रवृत्तीत बदल नाही
मात्र याबाबत काँग्रेस काय किंवा प्रशांत किशोर काय कुणीही स्पष्ट काहीही सांगितलेलं नाही. एक आठवड्यापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधी यांच्यामवेत कमलनाथ, मल्लिकार्जुन खर्गे, ए. के. अँटनी, अजय माकन, आनंद शर्मा, हरिष रावत, अंबिका सोनी आणि के. सी. वेणुगोपाल यांनी या विषयावर चर्चा केली असं इंडिया टुडेने म्हटलं आहे.
पक्षातल्या जुन्या खोडांना म्हणजेच पक्षातल्या जुन्या जाणत्या नेत्यांना पटेल का? हा प्रश्न आहेच. काँग्रेस पक्षाला 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये दारूण पराभव स्वीकारावा लागला. अशात आता 2024 च्या निवडणुकीच्या आधी प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये येऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App