Election 2023 : मेघालय आणि नागालँडमध्ये मतदानाला सुरुवात, 559 उमेदवारांच्या भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद

प्रतिनिधी

नवी दिल्ली : मेघालय आणि नागालँड या ईशान्येकडील दोन राज्यांमध्ये आज विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. महिनाभराहून अधिक काळ सुरू असलेला निवडणुकीचा प्रचार शनिवारी थांबला. दोन्ही राज्यांमध्ये विधानसभेच्या 60-60 जागा आहेत, परंतु यावेळी मेघालय आणि नागालँडमध्ये 59-59 जागांसाठी मतदान होत आहे. दोन्ही राज्यांत 40 महिला उमेदवारांसह एकूण 559 उमेदवार रिंगणात आहेत.Election 2023 Voting begins in Meghalaya and Nagaland, fate of 559 candidates locked in EVMs

दोन्ही राज्यांतील निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, शांततेत मतदान व्हावे यासाठी नागालँड पोलिस, केंद्रीय सुरक्षा दलासह विविध फौजा तैनात करण्यात आल्या आहेत. मेघालयमध्ये भाजप एनपीपीसोबत युती करत होता, तर नागालँडमध्ये एनडीपीपीसोबत आघाडी करून सत्तेत होता.



मेघालयमध्ये 36 महिलांसह 375 उमेदवार

यावेळी मेघालयमध्ये एकूण 375 उमेदवार रिंगणात आहेत, त्यापैकी 36 महिला आहेत. मागील सरकारमध्ये भाजपची एनपीपीसोबत युती होती, मात्र यावेळी भाजपने एकट्यानेच लढण्याचा निर्णय घेतला. येथे विधानसभेच्या 60 जागा आहेत, मात्र एका उमेदवाराचा मृत्यू झाल्यामुळे यावेळी 59 जागांवर मतदान होणार आहे. राज्यात एकूण 21,61,729 मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 10,68,801 असून महिला मतदारांची संख्या 10,92,326 इतकी आहे. दिव्यांग प्रवर्गातील 7,478 मतदार असून 80 वर्षे व त्यावरील वयोगटातील 22,658 मतदार आहेत. राज्यात प्रथमच मतदान करणाऱ्यांची संख्या 81,443 आहे.

मेघालयातील प्रमुख चेहरे

मुख्यमंत्री आणि एनपीपीचे अध्यक्ष कोनराड संगमा
तृणमूल काँग्रेसचे मुकुल संगमा
काँग्रेसचे अध्यक्ष व्हिन्सेंट पाला
भाजप प्रदेशाध्यक्ष अर्नेस्ट मोरी

नागालँडमध्ये चार महिलांसह 183 उमेदवार

दुसरीकडे नागालँडमध्येही मतदान होणार आहे. राज्यातील 13 लाखांहून अधिक मतदार चार महिला उमेदवारांसह एकूण 183 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. येथे एकूण 60 जागा आहेत, मात्र यावेळी 59 जागांवर मतदान होत आहे. भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार काझेटो किन्मी हे झुन्हेबोटो जिल्ह्यातील अकुलुतो मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले आहेत. यावेळी नागालँडमध्ये चार महिला सदस्यांसह एकूण 183 उमेदवार रिंगणात आहेत. नागालँडचे पोलीस महासंचालक रुपिन शर्मा यांनी सांगितले की, नागालँडच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. सुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आणि राज्य सशस्त्र पोलिस दलाच्या 305 कंपन्या आणि नागालँड पोलिसांच्या 15 बटालियनही तैनात करण्यात आल्या आहेत.

नागालँडमध्ये 13 लाखांहून अधिक मतदार

जाहीर सभा, रोड शो आणि मतदारांशी घरोघरी संपर्क करत झालेला विधानसभा निवडणुकीचा प्रचार शनिवारी सायंकाळी संपला. राज्यात 13 लाखांहून अधिक मतदार आहेत आणि 60 सदस्यांच्या विधानसभेच्या 59 जागांसाठी चार महिला आणि 19 अपक्षांसह 184 उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे.

नागालँडला पहिली महिला आमदार मिळेल?

नागालँड राज्य होऊन जवळपास 60 वर्षे झाली आहेत, मात्र आजपर्यंत या राज्यात महिला आमदार नाहीत, हे विशेष. यावेळी भाजपने एक, एनडीपीपीने दोन आणि काँग्रेसने एक महिला उमेदवार दिली आहे. यावेळी प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की महिला आमदार निवडून येईल की आणखी 5 वर्षे वाट पाहावी लागेल?

नागालँडचे प्रमुख चेहरे

सीएम नेफियू रिओ
भाजप प्रदेशाध्यक्ष तेमजेन इमना
एनपीएफचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री शूरहोझेली लिजित्सू
नागालँड प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष के. थेरी

तीनही राज्यांचे निकाल 2 मार्चला

त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या ईशान्येकडील तीन राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल 2 मार्च रोजी लागणार आहेत. मेघालय आणि नागालँडमध्ये आज मतदान होणार आहे. त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारीला मतदान झाले होते.

Election 2023 Voting begins in Meghalaya and Nagaland, fate of 559 candidates locked in EVMs

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात