विशेष प्रतिनिधी
बेळगावी : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये मराठी माध्यमे राजकीय अस्थिरतेचा शरद पवारांना अनुकूल नॅरेटिव्ह चालवत असताना त्यातले उपकथानक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपला “जड” किंवा नकोसे झाले आहेत, असाही नॅरेटिव्ह मराठी माध्यमे चालवत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षात तशी वस्तुस्थिती नसल्याचे “सिग्नल” भाजपने दिले आहेत. Eknath shinde on karnataka election tour, to campaign with amit shah in benguluru
एकनाथ शिंदे यांचा आजपासून 3 दिवसांचा कर्नाटक दौरा जाहीर झाला आहे आणि या दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर बंगलोर मध्ये रोड शो मध्ये सहभागी होणार आहेत. यातून भाजपने एकनाथ शिंदे आपल्याला नकोसे अथवा “जड” झालेले नाहीत, हा राजकीय मेसेज महाराष्ट्र, कर्नाटक आणि संपूर्ण देशात दिला आहे.
मराठी माध्यमांनी गेल्या 15 दिवसांमध्ये आपल्या सर्व बातम्यांचा फोकस राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र सरकार अस्थिर यावर ठेवला. त्यातही शरद पवारांच्या निवृत्ती नाट्याने त्यामध्ये मोठा ट्विस्ट आणून अखेरीस काल त्या नाटकावर पडदा पडला.
पण या सर्व कालावधीत मराठी माध्यमांनी एकनाथ शिंदे हे भाजपला “जड” किंवा नकोसे झाल्याचा नॅरेटिव्ह चालविला. सुप्रीम कोर्टाने शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरवले, तर शिंदे – फडणवीस सरकार अडचणीत येईल. त्यामुळे भाजप अजित पवारांच्या रूपाने मुख्यमंत्री पदाचा पर्याय शोधत असल्याच्या मराठी माध्यमांनी दिल्या. पण प्रत्यक्षात अशी वस्तुस्थिती नसल्याचा “सिग्नल” भाजप नेतृत्वाने देत एकनाथ शिंदे यांना कर्नाटक प्रचारात केवळ प्रतीकात्मक सामील करून घेतलेले नाही, तर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर त्यांचा बंगलोर मध्ये रोडशो आयोजित केला आहे.
इतकेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट हे फक्त कर्नाटकच्या सीमावर्ती भागांमध्ये प्रचारात गुंतले असताना एकनाथ शिंदे यांचा दौरा मात्र आवर्जून मध्य आणि दक्षिण कर्नाटकात ठेवला आहे. तेथे त्यांचे रोड शो, जाहीर सभा, पदयात्रेद्वारे नागरिकांशी संवाद असे विस्तृत कार्यक्रम होणार आहेत. उद्या रविवारी अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांचा बंगलोर मध्ये संयुक्त रोड शो होणार आहे.
महाराष्ट्रातली कथित अस्थिरता या नॅरेटिव्हला एकनाथ शिंदे आणि भाजप यांनी पत्रकार परिषद घेऊन किंवा बाईट देऊन उत्तर दिलेले नाही, तर प्रत्यक्ष 3 दिवसांचा विस्तृत कर्नाटक दौरा आखून राजकीय कृतीने प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 3 दिवसीय कर्नाटक दौरा
शनिवार दिनांक :- 6 मे 2023
रात्री 8.00 वाजता मुंबई विमानतळावरून कर्नाटक दौऱ्यासाठी प्रस्थान
रात्री 9.30 वाजता बंगळुरू येथे आगमन आणि राखीव
रविवार दिनांक :- 07 मे 2023
सकाळी 6.30 ते 8.00 वाजता बंगळुरू येथील कबोन पार्क येथील मतदारांसोबत चालून त्यांच्याशी संवाद साधणार
सकाळी 9.30 ते 10.30 वाजता डोड्डागणपती मंदिर, बसवनगुंडी, बंगळुरू येथे श्रीगणेशाच्या मंदिराला भेट देऊन पूजा व दर्शन घेणार
संध्याकाळी 4.00 ते 7.00 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत रोड शो मध्ये सहभागी होणार ( मार्ग :- चांदपुरा सर्कल ते इग्गालुरू हासुर मेन रोड अनेकल, बंगळुरू)
रात्री 8.00 वाजता बंगळुरू विमानतळावर आगमन त्यानंतर मंगळुरू कडे प्रस्थान
सोमवार 08 मे 2023
सकाळी 9.00 वाजता मंगळुरू येथून हेलिकॉप्टरने धर्मस्थळ येथे रवाना होणार
सकाळी 9.40 ते 10.40वाजता श्री मंजुनाथ स्वामी मंदिराला भेट देऊन पूजा आणि दर्शन करणार तसेच धर्मस्थळ संस्थानचे धर्माधिकारी श्री वीरेंद्र हेगडे यांची भेट घेणार
दुपारी 11.00 वाजता धर्मस्थळ येथून हेलिकॉप्टरने उडुपीकडे प्रस्थान
दुपारी 12 ते 12.30 वाजता श्रीकृष्ण मंदिर उडुपी येथे पूजा आणि दर्शन घेणार
दुपारी 3.00 ते 4.00 वाजता उडपी जिल्ह्यातील कापू विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी काढण्यात येणाऱ्या रोड शो मध्ये सहभागी होणार
दुपारी 4.00 ते 5.00 वाजता उडपी विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी काढण्यात येणाऱ्या रोड शो मध्ये सहभागी होणार
संध्याकाळी 5.00 वाजता प्रचार संपवून उडपीहुन हेलिकॉप्टरने मंगळुरूला परतणार
रात्री 9.00 वाजता मंगळुरू विमानतळाकडे प्रस्थान करून मुंबईकडे रवाना होणार
रात्री 10 वाजता मुंबईत आगमन आणि राखीव
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App