नाशिक : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी त महायुती स्वबळावर लढण्याची भाषा वाढत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजधानीत जाऊन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यांच्याशी राज्यातल्या मुद्द्यांबरोबरच बिहार विधानसभा निवडणुकीसंदर्भात सुद्धा चर्चा केली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची ही भेट बिहार निवडणुकी संदर्भात होती की राज्यातल्या भाजप नेत्यांना “इशारा” देण्यासाठी होती??, याची चर्चा दिल्लीसह मुंबईतल्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यात प्रामुख्याने मुंबई महापालिका, ठाणे महापालिका आणि त्या परिसरातल्या महापालिकांमध्ये राजकीय स्पर्धा आहे. कारण या सर्व क्षेत्रामध्ये भाजप आणि शिवसेना हे दोन हिंदुत्ववादी पक्ष इतर कुठल्याही पक्षांपेक्षा सर्वात प्रबळ आहे. त्यामुळे आपले राजकीय वर्चस्व टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने आणि वाढविण्याच्या दृष्टीने हे दोन्ही पक्ष एकमेकांचे स्पर्धा सहकार्य अशा दुहेरी संघर्षात अडकले.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपने महाराष्ट्रात भाजपला एक नंबरचा पक्ष करण्याचा वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि काही प्रमाणात दक्षिण महाराष्ट्र इथे शिवसेना भाजप बरोबर सहकार्य करून महायुतीची सत्ता आणू शकते. परंतु, मुंबई आणि ठाणे पट्ट्यात मात्र या दोन्ही पक्षांमध्ये स्पर्धा असल्याने दोघेही स्वतंत्र लढल्यास कोणती राजकीय स्थिती निर्माण होऊ शकते?? याची चाचपणी दोन्ही पक्षांचे बडे नेते करत आहेत.
– राजकीय संदेश काय??
एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि बिहार निवडणुका या दोन्ही ठिकाणी भाजपची निवडणूक स्ट्रॅटेजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी फारसे दिसले नाहीत. ते आंतरराष्ट्रीय राजकारण हाताळताना दिसतात, पण तरीदेखील एकनाथ शिंदे यांच्यासारख्या महत्त्वपूर्ण नेत्याला मोदींनी थेट अपॉइंटमेंट देऊन भेट दिली, यातून मोदींबरोबरच एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या नेत्यांनाही योग्य तो राजकीय संदेश दिला.
📍#नवी_दिल्ली | देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय @narendramodi जी यांची आज नवी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन दिवाळी आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. आदरणीय मोदीजींना शाल, पुष्पगुच्छ आणि संत तुकाराम महाराजांची मूर्ती भेट दिली. यावेळी अनेक विषयावर सकारात्मक… pic.twitter.com/mOvTjAXHOR — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 25, 2025
📍#नवी_दिल्ली |
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय @narendramodi जी यांची आज नवी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन दिवाळी आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
आदरणीय मोदीजींना शाल, पुष्पगुच्छ आणि संत तुकाराम महाराजांची मूर्ती भेट दिली. यावेळी अनेक विषयावर सकारात्मक… pic.twitter.com/mOvTjAXHOR
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 25, 2025
आपला पंतप्रधान मोदींशी थेट संपर्क आहे. त्यामुळे राज्यातल्या भाजपच्या नेत्यांनी सुद्धा “विशिष्ट राजकीय मर्यादा” ठेवून आपल्याशी संबंध प्रस्थापित ठेवावेत, असे एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिले. त्याचबरोबर ठाणे आणि परिसरातल्या बिहारी बांधवांशी शिवसेनेचा संपर्क वाढवून त्यांना बिहारच्या निवडणुकीसाठी कामाला लावले, असेही एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर पत्रकारांना सांगितले. त्यामुळे एकनाथ शिंदेंचे राजकीय महत्त्व फक्त महाराष्ट्र पुरते नाही तर देशातल्या अन्य निवडणुकांमध्ये सुद्धा विशिष्ट प्रमाणात आहे हा संदेश दिल्ली आणि मुंबईच्या राजकीय वर्तुळात गेला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App