ओरिसा, प. बंगालवर ओढवलेल्या चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच दौरा केला. यावेळी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे त्यांचे नियोजन होते. यावेळी त्याकडे बॅनर्जी यांनी घटनात्मक संकेत पायदळी तुडवले होते. पश्चिम बंगालच्या जनतेचे हित लक्षात न घेता स्वतःचा अहंकार गोंजारणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर सर्व क्षेत्रातून टीका होत आहे. Ego defeated public service, WB Governor Dhankhad criticizes Mamata
वृत्तसंस्था
कोलकाता : यास चक्रीवादळाच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर आलेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यामुळे प्रतिक्षा करावी लागली.
पूर्वनियोजित दौरा असूनही बॅनर्जी यांनी केवळ अहंकारापोटी घटनात्मक प्रथा, परंपरा आणि संकेत पायदळी तुडवले. यावर नाराजी व्यक्त करताना पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी बॅनर्जी यांच्यावर टीका केली.
धनखड म्हणाले की, हा प्रकार म्हणजे अहंकाराने केलेला लोकसेवेचा पराभव होय.लोकशाही व्यवस्थेत मुख्यमंत्र्यांइतकेच महत्त्व विरोधी पक्षनेत्यांना असते. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ही लोकशाहीची दोन चाके मानली जातात.
त्यामुळे पंतप्रधानांच्या बैठकीस पश्चिम बंगाल विधिमंडळातील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी हे देखील उपस्थित राहणार होते. याची पूर्वकल्पना बॅनर्जी यांना होती. मात्र याच अधिकारी यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बॅनर्जी यांचा पराभव केला आहे.
त्यामुळे अधिकारी ज्या बैठकीला आहेत त्या बैठकीला जाणे बॅनर्जी यांना बहुधा रुचले नाही आणि त्यांनी सरळ पंतप्रधानांच्या बैठकीकडे पाठ फिरवली. राज्यपाल धनखड आणि भाजपाच्या खासदार देबश्री चौधरी हे या बैठकीस उपस्थित होते.
राज्यपालांनी ममता बॅनर्जी यांच्या विधिनिषेधशून्य वर्तनाचा निषेध केल्यांतर तृणमूल कॉंग्रेसनेही त्यास प्रत्युत्तर दिले आहे. राज्यपालांची टीका दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चोवीस तास लोकांच्या सेवेत व्यस्त असतात.
राज्याच्या हितासाठी त्या सर्व कामे करतात, असे तृणमूल कॉंग्रेसने म्हटले आहे. तृणमूल कॉंग्रेसचे नेते आणि खासदार सौगत रॉय यांनी राज्यपाल धनखड यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, राज्यपालांना असे बोलण्याचा काहीच अधिकार नाही. काय करायचे आणि काय नाही, हे मुख्यमंत्र्यांना चांगलेच कळते.
ममता बॅनर्जी यांचे खंदे समर्थक असणाऱ्या अधिकारी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांची साथ सोडून भाजपात प्रवेश केला होता. याच अधिकारी यांच्याकडून नंदीग्राम मतदारसंघात बॅनर्जी यांना पराभव पत्करावा लागला.
त्याचा राग मनात असल्यानेच पंतप्रधानांच्या बैठकीला आमदाराचे काय काम, असा प्रश्न ममतांनी उपस्थित केला होता. मात्र अधिकारी हे केवळ आमदार नाहीत तर विरोधी पक्षनेते आहेत याकडे त्यांनी सोईस्कर डोळेझाक केली.
विशेष म्हणजे पंतप्रधानांच्या बैठकीस अन्य केंद्रीय मंत्री, राज्यपाल यांच्या उपस्थितीबद्दल ममतांना आक्षेप नव्हता. त्यामुळेच अधिकारी यांनी केलेला पराभव ममतांना अजूनही पचवता येत नसल्याचेे या घटनेतून सिद्ध झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App