प्रतिनिधी
नवी दिल्ली : आगामी दहीहंडी, गौरी गणपती सणांच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांना तेलाच्या किंमतीमध्ये 10 रुपयांपर्यंत दर कमी करण्याच्या सूचना सरकार करण्याची शक्यता आहे. हा निर्णय झाल्यास सामान्यांना महागाईतून मोठा दिलासा मिळेल. तेलाच्या किमती कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून खाद्यतेलांचे परीक्षण करण्यासाठी गुरूवारी खाद्य विभागाच्या सचिवांनी तेल कंपन्यांबरोबर बैठक आयोजित केली होती. Edible oil prices likely to decrease by Rs
8 ते 10 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता
सरकारने खाद्यतेलाच्या किमती आणखी कमी करण्याचा निर्णय घेतल्यास सामान्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. मागील महिन्यात तेल कंपन्यांनी 20 ते 25 रुपयांची घट केली होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही खाद्यतेलांच्या किंमती कमी झाल्यामुळे त्याचा फायदा छोट्या बाजारांना सुद्धा होत आहे. अन्न सचिवांशी झालेल्या बैठकीनंतर खाद्यतेल सुमारे 8 ते 10 रुपयांनी स्वस्त होऊ शकते, असे म्हटले जात आहे.
गेल्या महिन्यात काही तेल कंपन्यांनी 20 ते 25 रुपयांनी कपात केली होती त्यामुळे त्याचा परिणाम किरकोळ बाजारात सुद्धा दिसून येत आहे. भारत गरजेनुसार 60 % तेल आयात करतो आणि यामुळेच भारतातील तेलाच्या किंमती परदेशातील किमतीवर अवलंबून आहेत
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App