ईडीने न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी, असं आम आदमी पार्टीने म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आठवे समन्स पाठवले आहे. ईडीने केजरीवाल यांना ४ मार्च रोजी चौकशीसाठी बोलावले आहे.ED sends 8th summons to Kejriwal calls for questioning on 4 March
काही दिवसांपूर्वीच ईडीने केजरीवाल यांना सातव्यांदा समन्स पाठवून चौकशीत सहभागी होण्यास सांगितले होते. पण केजरीवाल ईडीच्या कार्यालयात गेले नाहीत. आम आदमी पार्टीने म्हटले आहे की, प्रकरण न्यायालयात असताना ईडी वारंवार समन्स का पाठवत आहे. ईडीने न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी.
याशिवाय आम आदमी पार्टीने दावा केला होता की ‘ईडी येत्या ३-४ दिवसांत केजरीवाल यांना अटक करेल. इंडिया आघाडीपासून वेगळे होण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. मात्र आप इंडिया आघाडीपासून फारकत घेणार नाही.’
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App