नाशिक : 3000 कोटी रुपयांच्या येस बँक घोटाळ्याच्या प्रकरणात सक्त वसुली संचालनालय अर्थात ED ने अनिल अंबानींच्या कंपन्यांच्या 35 ठिकाणांवर छापे घातले. येस बँकेने कुठल्याही आवश्यक कागदपत्रांची पडताळणी न करता अनिल अंबानींच्या कंपन्यांना कर्जे दिली. यामध्ये बँकेच्या अधिकाऱ्यांना लाचखोरी झाली. त्या कर्जातल्या विशिष्ट रक्कमा अनिल अंबानींच्या कंपन्यांनी वेगवेगळ्या शेल कंपन्यांमध्ये वळवून अफरातफर केली, असे त्यांच्यावर प्रमुख आरोप आहेत. म्हणून ED च्या टीम्सनी अनिल अंबानींच्या कंपन्यांच्या 35 ठिकाणांवर छापे घातले. तिथल्या कागदपत्रांची पडताळणी आणि तपासणी केली. मात्र या छाप्यांचे निष्कर्ष अजून समोर आलेले नाहीत. ED ने अधिकृतरित्या छाप्यांमधल्या निष्कर्षाचा खुलासाही केलेला नाही.
मात्र देशभरातल्या माध्यमांनी अनिल अंबानींच्या कंपन्यांवर ईडीने छापे घातल्याच्या बातम्या दिल्या. या पार्श्वभूमीवर दोन मोठे सवाल समोर आले ते म्हणजे अनिल अंबानींच्या कंपन्यांवर छापे घालून ED ने स्वतःच्या कार्यकक्षेचे उल्लंघन केले आहे का??, त्याचबरोबर मोदी सरकारने ED च्या यंत्रणेचा गैरवापर करून अंबानींच्या कंपन्यांवर छापे घालायला लावलेत का??, हे ते सवाल आहेत.
– राहुल गांधींचे आधीचे आरोप आणि आता
कारण आत्तापर्यंत राहुल गांधी आणि बाकीच्या विरोधकांनी कायमच मोदी सरकारवर अंबानी आणि अदानी या मुद्द्यांवरून शरसंधान साधले. अदानी आणि अंबानी हे मोदींचे दोन मित्र आहेत. त्यांचे खिसे भरण्यासाठीच मोदी सरकारने नोटबंदी केली. छोटे उद्योजक, व्यापारी, शेतकरी यांच्या खिशात हात घातला. त्यांचे पैसे काढून घेतले आणि ते अदानी आणि अंबानींना दिले, असा आरोप राहुल गांधींनी नेहमीच मोदी सरकारवर केला. त्या पलीकडे जाऊन ED, CBI यांच्यासारख्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून मोदी सरकारने विरोधकांना छळले. छोटे उद्योजक, शेतकरी, छोटे व्यापारी यांना त्रास दिला, पण अदानी आणि अंबानी यांच्यावर कधी छापे घातले नाहीत, असाही आरोप राहुल गांधी आणि बाकीच्या विरोधकांनी नेहमीच केला.
– मोदी सरकारचा छाप्यांमध्ये हस्तक्षेप नाही
पण आता जेव्हा ED ने अनिल अंबानी यांच्या कंपन्यांच्या 36 ठिकाणांवर छापे घातलेत, त्यावेळी केंद्रातल्या मोदी सरकारने ED च्या यंत्रणेचा वापर करून ते छापे घातले, की सत्तेचा गैरवापर करून छापे घातले??, याविषयी अजून तरी राहुल गांधी काही बोलले नाहीत. किंवा त्यांनी अद्याप कुठला आरोपही केलेला नाही. त्यामुळे मोदी सरकारने अजून तरी कुठला अधिकृत खुलासा केलेला नाही. पण ED ने अनिल अंबानींच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या 35 ठिकाणांवर छापे घातले. ते येस बँक घोटाळ्यासंदर्भातले होते एवढी माहिती मात्र बातम्यांमध्ये आली आहे. याचा अर्थ असा की किमान मोदी सरकारने अंबानी यांच्या कंपन्यांच्या 35 ठिकाणांवर वर छापे घालू नयेत, एवढे तरी सांगितले नसावे, असा तात्पुरता निष्कर्ष काढायला हरकत नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App