दिल्ली ते मुंबईपर्यंत EDकडून छापेमारी 367 कोटींची मालमत्ता जप्त

भूषण स्टील लिमिटेड विरुद्ध बँक फसवणूक प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग तपासाचा भाग


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सांगितले की भूषण स्टील लिमिटेड विरुद्ध बँक फसवणूक प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग तपासाचा भाग म्हणून दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि ओडिशाच्या काही शहरांमध्ये 367 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.ED raids from Delhi to Mumbai seize property worth 367 crores



ईडीने एका निवेदनात म्हटले आहे की, बनावट संचालकांद्वारे शेल कंपन्यांच्या नावावर असलेल्या मालमत्ता जप्त करण्यासाठी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) अंतर्गत तात्पुरता आदेश जारी करण्यात आला आहे.

कॉर्पोरेट दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर भूषण स्टील लिमिटेड (BSL) हे टाटा स्टील लिमिटेडने 2018 मध्ये विकत घेतले. ईडीने बीएसएल, त्याचे व्यवस्थापकीय संचालक नीरज सिंगल आणि सहयोगींवरही ‘अनेक शेल कंपन्या’ स्थापन केल्याचा आरोप केला आहे.

निवेदनानुसार, ‘या लोकांनी अनेक कंपन्यांचा वापर करून एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत पैसे ट्रान्सफर केले. हा पैसा भांडवल, मालमत्तेची खरेदी आणि इतर वैयक्तिक कारणांसाठी गुंतवणुकीसाठी पाठवण्यात आला होता, तर कर्ज देणाऱ्या बँकांचा हा हेतू नव्हता.

ED raids from Delhi to Mumbai seize property worth 367 crores

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात