कथित आर्थिक अनियमितता आणि मनी लाँड्रिंग प्रकरणांच्या संदर्भात ही कारवाई केली जात आहे
विशेष प्रतिनिधी
भिलाई : Bhupesh Baghel छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज (१० मार्च) सकाळी छापा टाकला. भिलाई येथील त्यांच्या निवासस्थानी हा छापा टाकण्यात आला. त्यांचा मुलगा चैतन्य बघेल याच्याही ठिकाणांवर छापा टाकण्यात आला. यासह, छत्तीसगडमधील एकूण १४ ठिकाणी ईडीचे छापे सुरू आहेत. कथित आर्थिक अनियमितता आणि मनी लाँड्रिंग प्रकरणांच्या संदर्भात ही कारवाई केली जात आहे. हे प्रकरण मद्य घोटाळ्याशी जोडलेले असल्याचे सांगितले जात आहे.Bhupesh Baghel
भूपेश बघेल मुख्यमंत्री असताना छत्तीसगडमध्ये मोठा मद्य घोटाळा झाल्याचे आरोप झाले होते. हा घोटाळा सुमारे २१६१ कोटी रुपयांचा असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत या प्रकरणात अनेक प्रमुख अधिकारी आणि एका माजी मंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. छत्तीसगड मद्य घोटाळ्याच्या प्रकरणाची ईडी चौकशी करत आहे. भूपेश बघेल हे २०१८ ते २०२३ दरम्यान छत्तीसगडचे मुख्यमंत्री होते. २०२३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला.
भूपेश बघेल यांच्या कार्यकाळात त्यांच्यावर आणखी दोन मोठे आरोप झाले आहेत. महादेव बेटींग अॅप आणि कोळसा कर घोटाळ्यातही त्यांच्यावर अनियमिततेचा आरोप आहे. कोळसा कर आकारणी घोटाळा सुमारे ५७० कोटी रुपयांचा असल्याचे सांगितले जाते. या आरोपांमुळे भूपेश बघेल यांना गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. सध्या ते काँग्रेसचे सरचिटणीस आहेत. भूपेश बघेल यांनी या छाप्यांना त्यांच्याविरुद्धचे कट म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App