मद्य घोटाळ्यात EDचे 32 ठिकाणी धाडसत्र; झारखंड, पश्चिम बंगालमध्ये कारवाई; मंत्रिपुत्राच्या घरातून 30 लाख जप्त


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी झारखंड, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये छापे टाकले. झारखंडमधील दारू घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे अर्थमंत्री रामेश्वर उराव, त्यांचा मुलगा रोहित उराव आणि दारू व्यवसायाशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले. ही ठिकाणे झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये आहेत. त्याच वेळी ईडीने छत्तीसगडमध्ये मनी लाँड्रिंग आणि बेटिंगमधील हवाला कनेक्शनप्रकरणी छापे टाकले.ED raids 32 locations in liquor scam; Action in Jharkhand, West Bengal; 30 lakh seized from minister’s son’s house



ईडीने दारू घोटाळ्याप्रकरणी धनबाद, देवघर, दुमका, गिरिडीह, हजारीबाग, जामतारा व कोलकात्यासह रांचीमधील ३२ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. यात झारखंडचे अर्थमंत्री रामेश्वर उराव यांचा मुलगा रोहित, मद्यविक्रेते योगेंद्र तिवारी व त्यांच्या साथीदारांवर कारवाई झाली. सकाळी ६.३० वाजल्यापासून सुरू झालेल्या छाप्यात ईडीला मंत्री ओराव यांच्या घरातून ३० लाख रुपये मिळाले आहेत. ईडीला विविध ठिकाणांहून अनेक महत्त्वाची कागदपत्रेही मिळाली आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार रोहितने योगेंद्र तिवारींच्या माध्यमातून या व्यवसायात मोठी रक्कम गुंतवली आहे.

छत्तीसगडमध्ये सट्टेबाज, मनी लाँड्रिंग, हवाला किंग टार्गेट

छत्तीसगडमध्ये सट्टेबाजी, मनी लाँड्रिंग आणि हवाला कनेक्शनशी संबंधित लोकांवर ईडीने सलग तिसऱ्या दिवशी रायपूर आणि दुर्ग-भिलाई येथे छापे टाकले. मुख्यमंत्र्यांचे राजकीय सल्लागार विनोद वर्मा यांच्या देवेंद्रनगर येथील बंगल्यावर पथक पाेहोचले. तीन टीम ओएसडी आशिष वर्मा, मनीष बनचोर आणि व्यापारी विजय भाटिया यांच्या भिलाई येथील घरी पोहोचल्या. तिथे सर्वांचे फोन, लॅपटॉप, दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली.

ED raids 32 locations in liquor scam; Action in Jharkhand, West Bengal; 30 lakh seized from minister’s son’s house

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!