नाशिक : National herald case मध्ये ED ने काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांच्या विरोधात राऊज नवीन कोर्टात खटला दाखल केल्यानंतर काँग्रेसने आज देशभरात निदर्शने आयोजित केली. अनेक ठिकाणी मोठे आंदोलन उभे करायचाही प्रयत्न केला, या सगळ्यातून काँग्रेसने सोनिया आणि राहुल यांच्यावरील खटल्याचा इंदिरा स्टाईल राजकीय वापर करायचा इरादाच समोर आणला. पण त्यामध्ये काँग्रेसचे नेते कितपत यशस्वी झाले??, याविषयी दाट शंकाच आहे.
कारण शेवटी इंदिरा स्टाईल वेगळी आणि सोनिया + राहुल स्टाईल वेगळी!! किंबहुना इंदिरा गांधींचा करिष्मा वेगळा आणि सोनिया + राहुल यांचा घटता करिष्मा वेगळा!!
1978 मध्ये जनता पक्षाच्या राजवटीत इंदिरा गांधी एका दिवसासाठी अटक केल्यानंतर त्या अटकेचे राजकीय भांडवल करून इंदिरा गांधींनी देशभरामध्ये जनता पक्षाविरुद्ध एवढा मोठा संताप उसळवून दिला होता की, अखेरीस जनता पक्षाची राजवट कोसळून पडली होती. अर्थात त्यामध्ये जनता पक्षातील अंतर्गत कलह मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरला होता, हे देखील उघड सत्य होते. पण इंदिरा गांधींनी आपल्या अटकेचा पुरेपूर राजकीय वापर करून comeback केले होते ही देखील वस्तुस्थिती नाकारण्यासारखी नव्हती.
जनता पक्षाचे त्यावेळचे गृहमंत्री आणि उपपंतप्रधान चरण सिंग यांनी इंदिरा गांधींच्या अटकेचे प्रकरण फार सैल हाताने हाताळल्याचा आरोप त्यावेळी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या गोटातून करण्यात आला होता. त्यामध्ये तथ्य होते. कारण इंदिरा गांधींना घाईगर्दीने अटक करण्याची गरज नाही, मोरारजी देसाई यांनी स्पष्ट बजावण्याचा उल्लेख त्यावेळच्या अनेक वृत्तपत्रांमध्ये आला होता. पण चरण सिंग यांनी स्वतःची प्रतिमा उजळवण्यासाठी इंदिरा गांधींच्या अटकेचा राजकीय खटाटोप केला होता. नंतर तो अंगलट आला.
पण इंदिरा गांधींची अटक, त्यानंतर त्यांचे comeback या काही झाले तरी ऐतिहासिक घटना. त्यांचा संबंध थेट आत्ताच्या सोनिया आणि राहुल वरील कारवाईची जोडणे तितके उचित नाही. कारण दोन कारवायांमधील तथ्य आणि वस्तुस्थिती पूर्ण वेगळी. इंदिरा गांधींवर त्यावेळी आणीबाणीच्या काळातल्या अत्याचाराच्या घटनांचे आरोप होते, पण ते सिद्ध होऊ शकले नाहीत.
त्या उलट राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर National herald case मध्ये थेट मनी लॉन्ड्री केल्याचा म्हणजे पैशाची अफरातफर केल्याचा आरोप आहे. केस 2012 ची असली तरी आता त्यातल्या कायदेशीर तथ्याच्या बाबी समोर आल्यात National herald च्या दिल्ली लखनऊ आणि मुंबईतल्या मालमत्तांवर जप्तीच्या नोटिसा चिकटल्यात या तिन्ही मालमत्तांची एकत्रित किंमत 661 कोटी रुपयांची आहे आणि त्या पलीकडे जाऊन ED ने राऊज अवेन्यू कोर्टात सोनिया गांधी, राहुल गांधी, सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांच्याविरुद्ध प्रॉसिक्युशन कंप्लेंट दाखल केली. या केस मधले कायदेशीर तथ्य इंदिरा गांधी यांच्यावरच्या आरोपांपेक्षा आणि अधिक गंभीर आहे.
– कुठे इंदिरा गांधी अन्…
शिवाय राजकीय दृष्टीने इंदिरा गांधींचे नेतृत्व, कर्तृत्व आणि विश्वासार्हता आणि सोनिया गांधी राहुल गांधींचे नेतृत्व, कर्तृत्व आणि विश्वासार्हता यामध्ये कमालीची तफावत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना आज जरी सोनिया आणि राहुल यांच्यावरील कायदेशीर कारवाईच्या विरोधात आंदोलने करण्याची आणि त्याचा राजकीय फायदा उपटण्याची खुमखुमी आली असली तरी त्यातून इंदिरा स्टाईलचा राजकीय फायदा मिळवणे जवळपास अशक्य आहे. कारण काँग्रेसची आता तेवढी ताकदच उरलेली नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App