वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Robert Vadra ईडीने हरियाणाच्या २००८ मधील जमीन सौद्यात काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांची गुरुवारी तिसऱ्या दिवशी ६ तास चौकशी केली. वढेरा गुरुवारी सकाळी ११ वाजल्यानंतर पत्नी प्रियंकासह ईडी कार्यालयात दाखल झाले. सायंकाळी सव्वासहा वाजता बाहेर पडले.Robert Vadra
पुढील चौकशीची तारीख दिलेली नाही. त्यांना १६-१७ प्रश्न विचारले. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार जबाब नोंदवला. सूत्रानुसार रजिस्ट्रीच्या िदवशी वढेरा यांची कंपनी स्कायलाइट हॉस्पिटॅलिटीच्या खात्यात १ लाख रुपये होते. परंतु ७.५ कोटी रुपयांचा धनादेश (६०७२५१) रजिस्ट्रीला दाखवला. तो कधीही वटवला नाही. परंतु या प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री खट्टर यांनी क्लीन चिट दिल्याचे वढेरांचे म्हणणे आहे.
वढेरांच्या कंपनीने पेमेंट न करताच ४२ कोटी रुपये कमावले
ईडी ने वढेरांना विचारले की, जमीन विक्री करणारी कंपनी आेंकारेश्वर प्रॉपर्टीजने ४५ लाखांची स्टॅम्प ड्युटी का भरली नाही? स्कायलाइट हॉस्पिटॅलिटीने कॉर्पोरेशन बँकेचा फेब्रुवारी २००८ चा ७.५ कोटी रुपयांचा धनादेश (६०७२५१)दिला. तो वढेरा यांची दुसरी कंपनी स्कायलाइट रिॲल्टीचा होता. सरकारी व्यवस्थेचा गैरवापर करण्यासाठी हा सौदा झाला असा ईडीला संशय आहे. रजिस्ट्रीच्या ५ दिवसांनंतर जमिनीचा वापर बदलण्याची परवानगी मागितली गेली. हरियाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी ४ दिवसांत मंजुरी दिली. नंतर जमीन ५८ कोटींत डीएलएफला विकली. रजिस्ट्रीच्या ६ महिन्यांनी डीएलएफला जमीन विकल्यानंतर स्कायलाइट हॉस्पिटॅलिटीने आेंकारेश्वर प्रॉपर्टीजला ७.९५ कोटी व ७.४३ कोटी रुपयांचे दोन चेकद्वारे १५.३८ कोटी दिले. जमिनीची किंमत ७.५ कोटी होती. ९ व १६ ऑगस्ट २००८ च्या या धनादेशांचे क्रमांक ०९७८९५१ व ०९७८९५३ आहेत. म्हणजे जमीन विक्री करणाऱ्या कंपनीला दुप्पट किंमत दिली. वढेरांच्या कंपनीने गुंतवणूक न करताच ४२ कोटींवर कमाई केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App