हरियाणाच्या सोनीपतमध्ये ‘ED’ची कारवाई, काँग्रेस आमदार सुरेंद्र पनवारला अटक

ED action in Sonipat Haryana Congress MLA Surendra Panwarla stuck

अटकेनंतर तपास यंत्रणेचे पथक सुरेंद्र पनवारला अंबाला येथील कार्यालयात घेऊन गेले. जिथे त्यांची चौकशी केली जाईल. ED action in Sonipat Haryana Congress MLA Surendra Panwarla stuck

विशेष प्रतिनिधी

हरियाणा : अंमलबजावणी संचालनालयाने शनिवारी सकाळी हरियाणामध्ये मोठी कारवाई करत काँग्रेस आमदार सुरेंद्र पनवारला अटक केली. तपास यंत्रणेने २० जुलै रोजी सकाळी काँग्रेस आमदार सुरेंद्र पनवार यांना सोनीपत येथून अटक केली. अवैध उत्खनन प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर तपास यंत्रणेचे पथक सुरेंद्र पनवारला अंबाला येथील कार्यालयात घेऊन गेले. जिथे त्यांची चौकशी केली जाईल.

अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने आदल्या दिवशी यमुनानगरमधील काँग्रेस आमदार सुरेंद्र पनवार आणि माजी आमदार दिलबाग सिंह यांच्या घरांवर छापे टाकले होते. तेथून ईडीला अनेक महत्त्वाचे पुरावे सापडले होते, त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने शनिवारी सुरेंद्र पनवारला अटक केली. बेकायदेशीर खाण प्रकरणी ईडीने काँग्रेस आमदार राव दान सिंह यांच्या १५ ठिकाणी छापे टाकले होते.

गुरुवारीच अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने काँग्रेस आमदार राव दान सिंह यांच्या १५ ठिकाणांवर छापे टाकले होते. राव दान सिंह हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भपेंद्र सिंह हुड्डा यांचे निकटवर्तीय मानले जातात. टीमने आधी बहादूरगडमध्ये १५ तास छापेमारी केली आणि त्यानंतर ईडीच्या टीमने त्याच्या गुरुग्रामच्या निवासस्थानाची २४ तास चौकशी केली. १३९२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी हा छापा टाकण्यात आला होता.

ED action in Sonipat Haryana Congress MLA Surendra Panwarla stuck

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात