सूचना जारी केली ; जाणून घ्या, कुठं कुठं चिकटवल्या आहेत नोटीस?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली :National Herald case काँग्रेस-नियंत्रित असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) विरुद्धच्या मनी लाँड्रिंग चौकशीत जप्त केलेल्या ६६१ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने(ED) शनिवारी नोटीस बजावल्याचे सांगितले.National Herald case
एका निवेदनात, तपास यंत्रणेने म्हटले आहे की त्यांनी शुक्रवारी दिल्लीतील आयटीओमधील हेराल्ड हाऊस, मुंबईतील वांद्रे परिसरातील परिसर आणि लखनऊमधील बिशेश्वर नाथ रोडवरील एजेएल भवन येथे नोटीस चिकटवल्या आहेत.
मुंबईतील मालमत्तेच्या बाबतीत जागा रिकामी करण्याची किंवा भाडे ईडीकडे हस्तांतरित करण्याची नोटीसमध्ये मागणी आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) कलम (8) आणि नियम 5(1) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App