आपल्याकडे असलेल्या पैशातून सोनं घेऊन ठेवणं, भिशीमध्ये पैसे गुंतवणं असे प्रकार गृहिणी करत असतात. पण यापेक्षा सुरक्षित, सोपे आणि फायदेशीर असे गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. गृहिणी या खरं तर मुळातच चांगल्या तऱ्हेने बचत करणाऱ्या असतात. कमीत कमी पैशात घर चालवून बचत कशी करता येईल, हे त्यांना नीट माहीत असतं. परंतु अशा प्रकारे परिश्रम घेऊन वाचविलेल्या पशांची त्या भिशी, चिटफंड अथवा सोनाराकडे महिन्याच्या हप्त्याच्या स्वरूपात गुंतवणूक करतात. अशा प्रकारच्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्याची मुख्यत: कारणे पुढीलप्रमाणे असतात. हे पैसे रोकड स्वरूपात गुंतवता येतात. कोणताही कागदोपत्री व्यवहार करावा लागत नाही. लहान लहान रकमेची रोकडही येथे स्वीकारली जाते. असा व्यवसाय करणाऱ्यांपर्यंत सहज पोहोचता येते. Security is as important as interest in investing
यामुळे भिशी, चिटफंड यासारखे गुंतवणूक पर्याय त्यांना सहजसोपे विनाकटकटीचे वाटतात व म्हणूनच गुंतवणुकीसाठी त्या यातले पर्याय निवडतात. परंतु हे गुंतवणूक पर्याय सहज सोपे वाटले तरी ते धोकादायक ठरू शकतात. अशी गुंतवणुक कुठल्याही कायद्याअंतर्गत येत नाहीत. त्यामुळे त्यात फसवणूक होऊन नुकसान सोसावे लागले तर, कितीही लहान किंवा मोठी रक्कम असली तरी कोणताही कायदा तुम्हाला मदत करू शकत नाही व झालेले नुकसान भरून देऊ शकत नाही. संसारात काटकसर करून जमा केलेले पैसे अशा प्रकारच्या गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतविण्याआधी थोडा विचार करा. तसेच भिशीवर कुठलेही व्याज मिळत नाही किंवा नफा होत नाही. फक्त भरलेली रक्कम एकरकमी परत मिळते.
चिटफंडसारख्या गुंतवणुकीत व्याज देण्यात येत असले तरी संबंधितांनी त्यामध्ये गुंतवलेले पैसे परत नाही दिले तरी तुम्ही काहीच करू शकत नाही. तसंच चिटफंडसारखी गुंतवणूक केल्यावर पैसे भरल्याच्या पुरावा म्हणून जे काही जे काही सर्टिफकेट अथवा कागदपत्र देतात ते एकदा वाचून पाहा. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीच्या कराराप्रमाणे अटी आहेत किंवा नाही हे तपासा. आपण विचार करतो की सर्टिफकेट मिळाले म्हणजे झाले. पण ते चुकीचे असेल तर ते असण्याला काहीच अर्थ उरात नाही. त्यामुळे अशा गुंतवणुकीचा मोहात न अडकता सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य देणे आवश्यक असते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App