मनी मॅटर्स : फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन्स (एफएमपी) बाबत अनेकांना नसते माहिती, एफएमपीत अशी करा गुंतवणूक

सध्या प्रत्येकाला कोठे गुंतवणूक करावी याबाबत फारशी माहिती नसते. सध्या गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय आहेत. त्यातील फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन्स (एफएमपी) बाबत अनेकांना माहिती नसते. एफएमपीमध्ये गुंतवणूक करताना हे लक्षात घ्या की, तुम्हाला हवे तेव्हा पैसे काढता येत नाहीत. जरी हे फंड शेअर बाजारात घेतले आणि विकले जातात तरी हे व्यवहार फार कमी होतात. शिवाय एफएमपी नक्की कुठल्या प्रतीच्या गुंतवणूक करत आहे हे बघणे खूप महत्वाचे आहे. कारण त्यांची जोखीम तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त असू शकते. डेट फंड हे एक दिवसांपासून ते ११ – १२ वर्षांपर्यंतच्या गुंतवणुकीसाठी असतात. तेव्हा तुमचा गुंतवणूक कालावधी आणि फंडाचा कालावधी यांचा समन्वय साधणे महत्वाचे आहे. परंतु जेव्हा व्याज दरांची नक्की दिशा ठरवता येत नसेल, तेव्हा दीर्घकाळ गुंतवणूक असणारे फंड टाळावे. Not many people know about Fixed Maturity Plans (FMPs), so invest in FMPs

ओव्हरनाईट फंड, लिक्विड फंड, अल्ट्रा शॉर्ट डय़ुरेशन, लो डय़ुरेशन फंड हे एक ते १२ महिन्यांसाठी, शॉर्ट डय़ुरेशन फंड हे एक ते तीन वर्ष, मीडियम डय़ुरेशन हे तीन ते पाच वर्ष आणि लॉँग डय़ुरेशन हे पाच वर्षांपुढील गुंतवणुकीसाठी वापरावे. गिल्ट फंड, बँकिंग आणि पीएसयू डेट फंडांमध्ये गुंतणवूक करताना ही गोष्ट नक्की ध्यानात ठेवा. गुंतवणूकदाराने पर्याय निवडताना जसे आर्थिक ध्येय, जोखीम आणि गुंतवणूक कालावधी लक्षात ठेवणे गरजेचे आहे, तेवढाच विचार करदायित्वाचा सुद्धा करणे आहे. डेट फंडांमधून डिव्हीडंड घेऊ नये कारण त्यांचा डिव्हीडंड डिस्ट्रिब्युशन टॅक्स हा २९.१२ टक्के इतका आहे. जर तुम्ही ३० टक्के स्लॅबच्या आत असाल, तर मग नकळतरित्या डिव्हीडंड मिळवण्यासाठी जास्त कर भरताय. त्या ऐवजी ग्रोथ पर्याय निवडून, तीन वर्षांनंतर पैसे काढल्यास २० टक्के कर आणि त्याआधी करदात्याच्या स्लॅबनुसार हे ध्यानात ठेवून मग गुंतवणूक करावी. कधी कधी बँकेत मुदत ठेवीत पैसे ठेवणे फायद्याचे ठरतात. त्यामुळे दर सहा महिन्यांनी गुंतवणुकीचा आढावा घ्या.

Not many people know about Fixed Maturity Plans (FMPs), so invest in FMPs

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात