लोक त्यांच्याजवळील पैसा कसा वापरतात हे आता पुढील काळात फार महत्वाचे ठरणार आहे. त्यातही ज्यांना शेअर बाजारात थेट गुंतवणूक करायची नाही मात्र त्यात होणारे लाभ घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी एक चांगला मार्ग आहे तो म्हणजे म्युच्युअल फंड. त्यातही म्युच्युअल फंडातून सुरक्षितरीत्या संपत्तीची निर्मिती करण्याचा एक सुलभ मार्ग म्हणजे, एखाद्या चांगली कामगिरी असणाऱ्या योजनेत काही दशकांसाठी एसआयपी करणे.Mutual funds – an easy way to create wealth
थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीनुसार तरुणांनी कमाई सुरू होताच एसआयपी सुरू केल्यास काही दशकांनंतर स्वतः गुंतवलेली रक्कम तर वाढत जातेच, त्याव्यतिरिक्त, आपण झालेला नफा काढून घेत नसल्याने आणि दीर्घमुदतीत शेअरच्या किमती वाढत असल्याने कालांतराने चक्रवाढवृद्धी हे जगातले आठवे आश्चतर्य काम करू लागते आणि संपत्तीच्या निर्मितीची प्रक्रिया वेग पकडते. जेव्हा आपण एखाद्या योजनेत एसआयपी करतो तेव्हा दर महिन्याला एक ठरावीक रक्कम गुंतवीत असतो. खरेदीची किंमत मात्र दर महिन्याला बदलत असते. जेव्हा एनएव्ही जास्त असते, तेव्हा कमी युनिट्स खरेदी केली जातात; तर जेव्हा एनएव्ही कमी असते, तेव्हा तेवढ्याच पैशात जास्त युनिट्स खरेदी होतात व त्यामुळे आपली युनिट्स खरेदीची सरासरी किंमत कमी होते. शिवाय, आपण छोटी खरेदी करीत असल्याने मार्केट टायमिंग करण्याचा प्रश्नकच उरत नाही.
शेअरबाजार कधी तेजीत तर कधी मंदीत असतो.त्याकडे दुर्लक्ष करून आपण जर सातत्याने एसआयपी काही दशकांसाठी चालू ठेवल्यास संपत्तीच्या निर्मितीची प्रक्रिया सतत सुरू राहते. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांना संपत्ती वाढवणे शक्य होते. तज्ञांच्या मदतीने चांगला म्युच्युअल फंड निवडला की त्यातील एसआयपी ही सतत लाभ देत राहते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App