SWAMIH : केंद्राच्या निधीच्या माध्यमातून पूर्ण होणाऱ्या पहिल्या गृहप्रकल्पाचे उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या हस्ते लाभार्थींना हस्तांतरण होणार आहे. हा प्रकल्प मुंबईच्या रिवळी पार्क मध्ये स्थित आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन माध्यमातूनच हा कार्यक्रम होणार आहे. याबाबत केंद्रीय अर्थमंत्रालयाने ट्वीटरवर माहिती दिली. मध्यम उत्पन्न गटासाठी परवडणारी घरेच्या विशेष खिडकी योजनेंतर्गत हा पूर्ण होणारा हा पहिला प्रकल्प आहे. Govt Funded first SWAMIH project Completed in Rivali Park Mumbai, FM sitharaman will handover the keys to the homebuyers in online ceremony
विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्राच्या निधीच्या माध्यमातून पूर्ण होणाऱ्या पहिल्या गृहप्रकल्पाचे उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या हस्ते लाभार्थींना हस्तांतरण होणार आहे. हा प्रकल्प मुंबईच्या रिवळी पार्क मध्ये स्थित आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन माध्यमातूनच हा कार्यक्रम होणार आहे. याबाबत केंद्रीय अर्थमंत्रालयाने ट्वीटरवर माहिती दिली. मध्यम उत्पन्न गटासाठी परवडणारी घरेच्या विशेष खिडकी योजनेंतर्गत हा पूर्ण होणारा हा पहिला प्रकल्प आहे.
Tomorrow, the Govt will commemorate the completion of construction of the first project funded by the Special Window for Affordable & Mid Income Housing. FM Smt.@nsitharaman will handover the keys to the homebuyers of Rivali Park, Mumbai in an online ceremony. #SWAMIH #Rivalipark pic.twitter.com/Ckmj0lOSzc — Ministry of Finance (@FinMinIndia) May 12, 2021
Tomorrow, the Govt will commemorate the completion of construction of the first project funded by the Special Window for Affordable & Mid Income Housing. FM Smt.@nsitharaman will handover the keys to the homebuyers of Rivali Park, Mumbai in an online ceremony. #SWAMIH #Rivalipark pic.twitter.com/Ckmj0lOSzc
— Ministry of Finance (@FinMinIndia) May 12, 2021
सन 2019 पासूनच रिअल इस्टेट क्षेत्राला अनेक कारणांमुळे प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागत होता. यामुळे अनेक गृहनिर्माण प्रकल्प रखडलेले होते. अशा वेळी या क्षेत्राला तत्काळ मदतीची गरज होती. यामुळे केंद्राने SWAMIH म्हणजे स्पेशल विंडो फॉर फंडिंग स्टाल्ड अफॉर्डेबल अँड मिडल इन्कम हाउसिंग प्रोगामची सुरुवात केली. या गुंतवणूक निधीचे मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात आले.
SWAMIH निधीचा उद्देश हा केंद्राने निश्चित केलेले मापदंड पूर्ण करणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांना 25 हजार कोटी रुपयांपर्यंत आर्थिक साहाय्य करण्याचा आहे. कारण हे प्रकल्प पूर्ण झाल्यावर या क्षेत्रात विक्रीला चालना मिळून रोखीमध्ये वाढ होणार आहे. तथापि, कोरोना महामारीमुळे या क्षेत्राला आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला खोल संकटात ढकलले होते. स्वत:चे हक्काचे घर असावे याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो खरेदीदारांमध्ये निराशा आलेली होती. अशावेळी रिअल इस्टेट क्षेत्राला पुन्हा उभारी देण्याचे काम केले. केंद्राच्या या निधीमुळे या क्षेत्रात तब्बल 5 कोटी रोजगाराचेही उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ही योजना राष्ट्रीय पातळीवर 250 हून जास्त सहायक उद्योगांशी जोडलेली आहे.
Govt Funded first SWAMIH project Completed in Rivali Park Mumbai, FM sitharaman will handover the keys to the homebuyers in online ceremony
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App