बुलेटची निर्मिती करणारी ख्यातनाम कंपनी रॉयल एनफील्डने भारतातील आपल्या सर्वाधिक लोकप्रिय मॉडेल्सपैकी एक असलेल्या आरई 350 च्या किंमतीत वाढ केली आहे. बुलेट 350 च्या किक स्टार्ट आणि इलेक्ट्रिक स्टार्ट या दोन्ही व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरातील ही दुसरी किंमत वाढ आहे. Big increase in the price of Royal Enfield bullets
विशेष प्रतिनिधी
मुंबई : बुलेटची निर्मिती करणारी ख्यातनाम कंपनी रॉयल एनफील्डने भारतातील आपल्या सर्वाधिक लोकप्रिय मॉडेल्सपैकी एक असलेल्या आरई 350 च्या किंमतीत वाढ केली आहे. बुलेट 350 च्या किक स्टार्ट आणि इलेक्ट्रिक स्टार्ट या दोन्ही व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरातील ही दुसरी किंमत वाढ आहे.
मेटॉर ३५० बुलेटच्या किंमतीत सहा हजार रुपयांनी तर आरई ३५० बुलेटच्या किंमतीत सात ते १३ हजार रुपयांची वाढ झाली आहे. बुलेट ३५० ची जुनी किंमत १,३३, ४४६ रुपये होती. आता तिच्यासाठी १,४०,८२८ रुपये मोजावे लागणार आहे.
बुलेट ३५० केसची किंमत १,३४, ३४७ रुपये झाली आहे. पूर्वी ही बुलेट १, २७,२७९ रुपयांना मिळत होती. बुलेट ३५० ईएसच्या किंमतीत सर्वाधिक वाढ आहे. पूर्वी १,४२,८९० रुपयास मिळणाºया या बुलेटची किंमत आता १,९९,६७९ रुपयांना मिळणार आहे. मेटॉर ३५० ची किंमत १,७८,७४४ रुपयांवरून १,८४,३१९ रुपयांवर गेली आहे.
भारतातील कंपनीच्या लाइन-अपमधील बुलेट सर्वाधिक जुने मॉडेल असून भारतीय बाजारात ही बाइक खूप लोकप्रिय आहे. सध्या कंपनी भारतात क्लासिक आणि थंडरबर्ड मॉडेल्सची टेस्टिंग घेत आहे. लवकरच हे नवे मॉडेल्स लाँच करण्याची शक्यता आहे. हे नवे मॉडेल्स आधीपेक्षा आकर्षक डिझाइन आणि फीचर्ससह लाँच होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App