केंद्र सरकारने अर्थसंकल्पात प्राप्तिकरात केलेल्या बदलांची अंमलबजावणी एक एप्रिल २०२१ पासून सुरु झाली आहे. आर्थिक गुंतवणूक करताना यातील प्रमुख बदल माहिती असले पाहिजेत. जास्तीत जास्त लोकांनी प्राप्तिकर विवरणपत्र (रिटर्न) भरावीत म्हणून या अर्थसंकल्पात कलम २०६एबी आणि २०६ सीसीए यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार रिटर्न सादर न करणाऱ्या करदात्यांचा टीडीएस वाढीव दराने केला जाणार आहे. परिणामी, जर एखाद्याचे उत्पन्न करपात्र असूनसुद्धा रिटर्न सादर केले नसेल तर मिळणाऱ्या व्याजावर १० टक्क्यांऐवजी आता २० टक्के ‘टीडीएस’ होईल. मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावर जशी करआकारणी होते, तशीच करआकारणी आता भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) मध्ये अडीच लाखांवरील कर्मचाऱ्याने केलेल्या गुंतवणुकीवर केली जाईल. Be sure to keep this information in mind before investing
यामुळे ज्यांचे मासिक उत्पन्न दोन लाखांहून अधिक आहे, असे नोकरदार अडीच लाखांवरील गुंतवणुकीवर करमुक्त व्याजाचे उत्पन्न मिळवू शकणार नाहीत. आता ही मर्यादा. पाच लाखांपर्यंत वाढविली आहे. मात्र, ज्यांच्या कंपन्या किंवा संस्था पीएफमध्ये योगदान करत नाहीत, अशा नोकरदारांनाच या वाढीव मर्यादेचा लाभ घेता येईल. थोडक्यात, ज्या सरकारी नोकरांना पेन्शन लागू आहे असेच लोक याचा फायदा घेऊ शकतील. ७५ वर्षांवरील वयाच्या ज्येष्ठ नागरिक व ज्यांना पेन्शन व व्याजाव्यतिरिक्त अन्य काही उत्पन्न नसेल, अशा ज्येष्ठ नागरिकांना आता रिटर्न सादर करण्याची गरज नसेल. सर्वसामान्य करदात्यास रिटर्न भरणे सहज व सोपे व्हावे म्हणून यापुढे रिटर्नच्या फॉर्ममध्ये पगाराचा तपशील, भरलेला कर, टीडीएस ही माहिती आधीच त्या फॉर्ममध्ये भरलेली असेल. याआधी ही सुविधा केवळ नोकरदारांनाच होती, की ज्यांचा फॉर्म १६ हाच उत्पन्नाचा तपशील असतो. आधार कार्ड आपल्या पॅनकार्डला जोडण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२१ होती. मात्र, नुकताच याचा कालावधी ३० जून २०२१ पर्यंत वाढविण्यात आला आहे. जर या तारखेच्या आत पॅनकार्ड हे आपल्या आधार कार्डला लिंक झाले नाही, तर संबंधित पॅनकार्ड निष्क्रीय होईल; तसेच प्राप्तिकर कलम २७२बी नुसार रु. १० हजारांचा दंडही होऊ शकतो. त्यामुळे आपले आधार कार्ड अद्याप पॅनकार्डला जोडले नसेल, तर लवकरात लवकर ते करावे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App