कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात फ्लॅटखरेदी ही सर्वांत महाग बाब असते. कोणताही फ्लॅट काही लाखांच्या आत येत नाही. त्यामुळे फ्लॅट घेताना फार काळजी घेणे आवश्यक असते. फ्लॅटबाबत ७० ते ८० टक्के ग्राहक प्रत्यक्ष बिल्डरला न भेटताच अंतिम निर्णय घेतात. सेल्स टीमसाठी एक विशिष्ट मर्यादा असते. त्याच्याखाली ते डील देऊ शकत नाहीत. पण थेट बिल्डरसोबत भेट घेऊन अजून वाटाघाटी केल्या तर अधिक चांगले डील मिळू शकते. बऱ्याच वेळा बिल्डर आपला प्रोजेक्ट एखाद्या ब्रोकिंग एजन्सीकडे मार्केटिंगसाठी देतात आणि त्यांना एक मूलभूत किंमत निश्चित करून दिलेली असते. अशा स्थितीत एका तृतीय संस्थेमार्फत व्यवहार केला जात असतो. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी काही वेळेस विविध आश्वासने दिली जातात. Be sure to check these things when buying a flat
अशावेळी सर्व चर्चा आणि संभाषण ई-मेल किंवा लिखित स्वरूपात घ्यावे, ज्यामध्ये बिल्डरांना अंतर्भूत करावे. ताबा दिल्यानंतर त्या प्रोजेक्टमध्ये बिल्डर नक्की काय करणार, हे करार करताना पडताळून पाहावे म्हणजे गृहनिर्माण संस्था किंवा अपार्टमेंट डीड आदी. यामुळे जमीन मालकी हक्काविषयी निश्चितता मिळते. नियम व अटी काळजीपूर्वक वाचाव्यात, नाहीतर दिलेल्या सवलती आणि सुविधा वापरण्यासाठी कदाचित पैसे द्यावे लागतील. टेरेसचे (गच्ची) हक्क काही बिल्डर राखीव ठेवतात. त्यामुळे भविष्यात होर्डिंग आणि मोबाइल कंपनीचे टॉवर सहन करावे लागतात आणि त्याच्यातून मिळणारे उत्पन्न कायमस्वरुपी बिल्डरला मिळत राहते. त्यामुळे करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी या गोष्टीची पडताळणी जरूर करावी.
बऱ्याच वेळेस बिल्डर प्रोजेक्टमध्ये व्यावसायिक अधिकार राखून ठेवतात, त्यामुळे भविष्यात बाहेरील व्यक्ती तुमच्या प्रोजेक्टमध्ये येऊ शकतो किंवा काही गोष्टींच्या वापरावर मर्यादा येऊ शकतात आणि त्यासाठी अधिक पैसे देखील मोजावे लागू शकतात. त्यामुळे असा उल्लेख असल्यास करारामध्ये बदल करून घ्यावेत. मूलभूत गरजा आणि त्यासाठीचे प्रयोजन नक्की जाणून घ्या. पाणी, वीज, रस्ता आदी गोष्टी रोजच्या दैनंदिन जीवनात अति महत्त्वाच्या आहेत. याबद्दल बिल्डरकडून तोंडी आश्वांसने दिली गेली असल्यास सुजाण ग्राहक या नात्याने सर्व गोष्टींची शहानिशा करूनच अंतिम निर्णय घ्यावा.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App