Vote chori चोरीच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाच्या नव्या गाईड लाईन्स; उमेदवारांच्या रंगीत फोटोसह गुलाबी पेपर वर सिरीयल नंबरची ठळक छपाई!!

ECI revises

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : Vote chori च्या आरोपानंतर निवडणूक आयोगाच्या आल्या नव्या गाईडलाईन्स; उमेदवारांच्या रंगीत फोटोसह गुलाबी पेपर वर सिरीयल नंबरची ठळक छपाई!!, करायचे आदेश निवडणूक आयोगाने आज काढले. बिहार विधानसभा निवडणुकीपासून निवडणूक आयोगाच्या नव्या गाईड लाईन्सची अंमलबजावणी होणार आहे.

राहुल गांधी आणि बाकीच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगावर मतदान चोरीचा आरोप केला. या आरोपाला निवडणूक आयोगाने कायद्याच्या कक्षेत राहून उत्तर दिले. परंतु राहुल गांधी आणि विरोधी पक्षांनी मतदान चोरीचा आरोप करणे सोडले नाही. याच दरम्यान निवडणूक आयोगाने कायद्याच्या कक्षेत राहून निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्याचे वेगवेगळे मार्ग अवलंबिले. त्यातूनच आज निवडणूक आयोगाने नव्या गाईड लाईन्स जारी केल्या.

– नव्या सुधारणा

नव्या गाईड लाईन्स नुसार इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वर प्रत्येक उमेदवाराचा रंगीत फोटो छापला जाईल‌. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या गुलाबी रंगाच्या बॅलेट पेपरवर सिरीयल नंबर देखील ठळक ३० पॉईंट मध्ये बोल्ड फॉन्ट मध्ये छापला जाईल. त्यामुळे उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी आणि मतदार यांना उमेदवाराचा फोटो आणि सिरीयल नंबर ठळकपणे दिसू शकेल. त्याचबरोबर सगळ्या उमेदवारांची नावे आणि नोटाचा पर्याय यांना एकाच फॉन्ट मध्ये आणि एकाच बोल्ड टाईप मध्ये छापायचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलाय. त्यामुळे निवडणूक आयोगाची सर्व उमेदवारांप्रती आणि मतदारांप्रती समानता असल्याचे स्पष्ट होईल. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचे बॅलेट पेपर्स 70 जीएसएमचे असतील आणि ते गुलाबी रंगाचे असतील. बिहार विधानसभा निवडणुकीपासून याच स्वरूपाचे बॅलेट पेपर्स वापरण्यात येतील.

– 28 सुधारणा आधीच स्वीकारल्या

निवडणूक आयोगाने गेल्या सहा महिन्यांमध्ये निवडणूक प्रक्रियेत 28 नव्या सुधारणा स्वीकारल्या त्यानंतर वर उल्लेख केलेल्या नव्या गाईड लाईन्स आज 17 सप्टेंबर 2025 रोजी जारी केल्या.

ECI revises guidelines to make EVM Ballot Papers more readable

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात