वृत्तसंस्था
सिलिगुडी : पश्चिम बंगाल वर एकेकाळी निर्विवाद सत्ता गाजवलेला कम्युनिस्ट पक्ष गेल्या कित्येक वर्षात झोपी गेला होता. तो आता विद्यार्थ्यांच्या रूपाने “जागा” झाला. डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया DYFI या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी सिलिगुडी मध्ये मोठे आंदोलन केले, पण ममता बॅनर्जी यांच्या पोलिसांनी ते आंदोलन मोडून काढताना आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना झोडपून काढले.DYFI: Communists “awakened” in Bengal after many years; Mamata’s police washed away protesting students!!
पश्चिम बंगालमध्ये प्रचंड भ्रष्टाचार वाढलाय. ममता बॅनर्जींचे सरकार युवकांना नोकऱ्या आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत नाही. त्याच्या निषेधार्थ डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया DYFI या विद्यार्थ्यांच्या डाव्या संघटनेने सिलीगुडी मध्ये आंदोलन केले. त्यांनी ठिक ठिकाणी चक्काजाम केले. आंदोलनकर्ते मोठ्या मोर्चाने सेक्रेटरीएट कडे निघाले होते, पण पोलिसांनी तिथे बॅरिकेट लावून मोर्चा अडवला तरी देखील आंदोलनकर्ते विद्यार्थी सेक्रेटरीएट वर चालून जायच्या घोषणा करत राहिले. त्यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना हुसकावून लावण्यासाठी वॉटर कॅनन वापर करून अश्रू धूर सोडला. एवढे करूनही तिथेच रस्त्यावर बसून राहिलेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन चालू ठेवले म्हणून पोलिसांनी लाठ्या काठ्या घेऊन त्यांना झोडपून काढले.
#WATCH | West Bengal: Police in Siliguri use water cannons, tear gas shells and lathi charge to disperse DYFI cadres who are holding a protest march towards Uttarkanya, Mini secretariat, alleging corruption in the state and demanding employment. Police have put up barricades to… pic.twitter.com/FtdfoX1jBx — ANI (@ANI) March 28, 2025
#WATCH | West Bengal: Police in Siliguri use water cannons, tear gas shells and lathi charge to disperse DYFI cadres who are holding a protest march towards Uttarkanya, Mini secretariat, alleging corruption in the state and demanding employment. Police have put up barricades to… pic.twitter.com/FtdfoX1jBx
— ANI (@ANI) March 28, 2025
कम्युनिस्ट पार्टीचे एकेकाळी पश्चिम बंगालवर निर्विवाद सत्ता होती. तब्बल 35 वर्षे कम्युनिस्टांनी त्या प्रदेशावर राज्य केले. पण ममता बॅनर्जी यांनी कम्युनिस्टांचे राजकीय अस्तित्व पुसून टाकले. आज कम्युनिस्ट पार्टीचा पश्चिम बंगाल विधानसभेत एकही आमदार नाही. कम्युनिस्टांच्या सर्व प्रकारच्या संघटना ममता बॅनर्जींच्या सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने मोडून काढल्या. विरोधी पक्ष म्हणून भाजपचा तिथे उदय झाला आणि टप्प्याटप्प्याने भाजप देखील बळकट झाला. या प्रक्रियेत कम्युनिस्ट पक्ष आणि त्यांच्या वेगवेगळ्या संघटना पूर्णपणे नेस्तनाबूत झाल्या, पण आज अचानक सिलिगुडी मध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या विद्यार्थी संघटनेला “जाग” आली आणि त्यांनी आंदोलन केले, पण ममता बॅनर्जींच्या पोलिसांनी त्यांना झोडपून काढले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App