वृत्तसंस्था
बेंगलोर : इकडे केंद्र सरकार परदेशी पर्यटकांना भारतात आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना अमलात आणत आहे भारतातील हेरिटेज ठिकाणी जगासमोर आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यात काही परदेशी व्लॉगरही मदत करत असतात पण काही ठिकाणी मात्र या व्लॉगर्सना भारतात अतिशय वाईट अनुभव येतो असाच वाईट अनुभव डच vlogger पेड्रो मोटा याला बेंगलोर मध्ये आला.Dutch vlogger Pedro Motala experiences bullying in Bangalore; A case has been registered against Nawab Hayat Sharif
बेंगलोरच्या रस्त्यावर व्लॉगिंग करत असताना पेड्रो मोटा याला रस्त्यावरचा विक्रेता नवाब हयात शरीफ याने रोखले आणि त्याच्याशी दादागिरी केली. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यावर बेंगलोर पोलिसांनी नवाब हयात शरीफ विरुद्ध फौजदारी कायदा कलम 92 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Karnataka | A Dutch vlogger Pedro Mota was manhandled on a busy road in the Chickpet area of Bengaluru while the YouTuber was recording a vlog on the streets Regarding a complaint about misbehaving with foreigner Pedro Mota, a case has been registered against the person Navab… pic.twitter.com/P72rOzH2x8 — ANI (@ANI) June 12, 2023
Karnataka | A Dutch vlogger Pedro Mota was manhandled on a busy road in the Chickpet area of Bengaluru while the YouTuber was recording a vlog on the streets
Regarding a complaint about misbehaving with foreigner Pedro Mota, a case has been registered against the person Navab… pic.twitter.com/P72rOzH2x8
— ANI (@ANI) June 12, 2023
केंद्र सरकार एकीकडे प्रदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी भारतातील हेरिटेज वास्तु, शहरे यांच्या विषयीची माहिती वेगवेगळ्या माध्यमातून पुढे आणते. भारत कसा स्वागतशील आणि अगत्यशील देश आहे, याचे वर्णन करते. पण त्याच वेळी परदेशातल्या काही व्यक्तींना मात्र भारतात दुर्दैवाने कटू अनुभव येत असल्याने भारताची प्रतिमा खराब होते. मध्यंतरी मुंबईच्या रस्त्यावर एका कोरियन महिलेचा विनयभंग केला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दोन मुस्लिम युवकांना शोधून त्यांना अटक केली होती.
अशाच प्रकारचा अनुभव बेंगलोरच्या रस्त्यावर डच व्लॉगर पेड्रो मोटा याला आला. पण बंगलोर पोलिसांनी त्याच्याशी दादागिरी करणाऱ्या नवाब हयात शरीफ विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App