नेहेल्यावर देहेल्या ऐवजी दुर्री – तिर्रीच!!; भाजपच्या 195 च्या बदल्यात काँग्रेसचे फक्त 39 उमेदवार जाहीर; राहुल वायनाडमधूनच!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रातल्या मोदी सरकारला आव्हान देण्यासाठी राहुल गांधी संपूर्ण भारत उभा आडवा 6000 किलोमीटर फिरत असताना काँग्रेस भाजपच्या नेहेल्यावर देहेला टाकेल असे वाटत होते, पण प्रत्यक्षात काँग्रेसने भाजपच्या नेहेल्यावर देहेला टाकण्याऐवजी दुर्री – तिर्रीच टाकली. भाजपच्या 195 उमेदवारांच्या बदल्यात काँग्रेसने फक्त 39 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये त्यांनी राहुल गांधी, भूपेश बघेल, के. सी. वेणूगोपाल, डी. के. सुरेश, के. सुधाकरन आदी नेत्यांचा समावेश केला.Durri instead of Dehelya after Nehela – Tirrich!!; Congress declared only 39 candidates against BJP’s 195; Rahul from Wayanad!!

आमची यादी पाहता आम्ही जिंकण्यासाठीच लोकसभा निवडणूक लढवत आहोत, हे स्पष्ट होईल अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी व्यक्त केली.



पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच्या भाजपला पराभूत करण्यासाठी राहुल गांधी प्रचंड आटापिटा करत आहेत. त्यांनी भारत देश उभा फिरून झाला आहे. आता ते भारत देशात आडवे फिरत आहेत. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची एकूण लांबी रुंदी 6200 किलोमीटर आहे. एवढी प्रचंड पायपीट करून राहुल गांधी नरेंद्र मोदींसमोर खऱ्या अर्थाने प्रचंड मोठे आव्हान उभे करणार, अशा अटकळी अनेकांनी बांधल्या होत्या. त्यामुळे भाजपने जर 195 उमेदवार जाहीर केले, तर काँग्रेस देखील तोडीस तोड तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवार जाहीर करून नरेंद्र मोदींना फाऊल करतील, अशी शक्यता अनेकांनी वर्तवली होती. परंतु, ती आज खोटी ठरली.

काँग्रेसने भाजपच्या 195 उमेदवारांच्या बदल्यात फक्त स्वतःच्या पक्षाचे 39 च उमेदवार पहिल्या यादीत जाहीर केले. त्यामध्ये राहुल गांधी, भूपेश बघेल, के. सी. वेणुगोपाल, डी. के. सुरेश, के. सुधाकरन यांच्यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे. छत्तीसगड, केरळ कर्नाटक, तेलंगणा त्रिपुरा आणि मेघालय या सहाच राज्यांमधले काही उमेदवार काँग्रेसने पहिल्या यादीत जाहीर केले आहेत.

काँग्रेसच्या यादीतले सर्वांत मोठे नाव राहुल गांधींचे असून ते केरळच्या वायनाड मधून पुन्हा आपले नशीब आजमावणार आहेत. याचा सरळ अर्थ असा की, राहुल गांधींनी उत्तर प्रदेशा मधल्या अमेठी वरचा आपला दावा कायमचा सोडून दिला आहे.

के. सी. वेणूगोपाल यांना काँग्रेसने आळापुळा या केरळ मधल्या मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे, तर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे भाऊ डी. के सुरेश यांना बंगलोर ग्रामीण मधून काँग्रेसने तिकीट दिले आहे. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना काँग्रेसने राज्याच्या राजकारणातून दूर करून राजनंदगाव मधून तिकीट दिले आहे. त्यामुळे ते तिथून जिंकले तरच राजकारणात टिकून राहतील, अन्यथा ते राजकारणातूनच बाजूला होण्याची दाट शक्यता आहे. के सुधाकरन यांना केरळ मधल्या कुन्नूर लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरविले आहे.

Durri instead of Dehelya after Nehela – Tirrich!!; Congress declared only 39 candidates against BJP’s 195; Rahul from Wayanad!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात