वृत्तसंस्था
मुंबई : दोन दिवसापूर्वी होळीच्या निमित्ताने 8 मार्चला रिलीज झालेला रणवीर कपूर आणि श्रद्धा कपूर या जोडीचा सिनेमा “तू झुठी मै मक्कार” रिलीज झाला. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा जोरदार चालताना दिसला. तर दुसऱ्या दिवशी सिनेमा घसरणीला लागला आहे. असे एका न्यूज मध्ये कळते. तर दुसऱ्या न्यूज मध्ये सिनेमा दुसऱ्याच दिवशी बॉक्स ऑफिस पर हिट अशी बातमी वाचायला मिळते.
दिग्दर्शक लव रंजन दिग्दर्शित ‘तू झुठी मैं मक्कार’ हा सिनेमा रिलीज व्हायच्या आधीपासूनच सर्व तरुणांमध्ये या सिनेमाबद्दल चर्चा होती. ट्विस्ट असलेली ही लव स्टोरी वेगळ्याच अँगलने मांडली आहे. असे ट्रेलर मध्ये दिसत होते. यासाठी तरुणांमध्ये मोठीच उत्सुकता लागून राहिली होती. श्रद्धा कपूर आणि रणवीर कपूर ह्या जोडीला नव्याने पडद्यावर पाहायला मिळणार होते. त्यामुळे चाहत्यांमध्ये अजूनच या सिनेमाविषयी चर्चा रंगत होती.
सिनेमाने पहिल्या दिवशी 15.77 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. तर दुसऱ्या दिवशी दहा कोटी रुपयांची मजल मारत दोनच दिवसात 25.73 कोटी रुपयांची जोरदार कमाई केली आहे. पण याचवर मीडियामध्ये थोडी परस्परविरोधी मते मांडलेली दिसत आहेत. सिनेमा नक्की हिट आहे? की घसरणीला लागला आहे? हे सांगता येत नाही. पण कदाचित येत्या विकेंडला यातलाच एक रिझल्ट चहात्यांचा समोर येईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App