नूह येथील जलाभिषेक यात्रेमुळे २४ तास इंटरनेट सेवा बंद, एसएमएस सेवेवरही बंदी

Due to Jalabhishek Yatra at Noah 24 hours internet service is off, SMS service is also banned

प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलले आहे.

विशेष प्रतिनिधी

नुह : हरियाणातील मेवात जिल्ह्यातील नूहमध्ये पुढील २४ तासांसाठी इंटरनेट सेवेवर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय बल्क एसएमएस पाठविण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. ब्रज मंडळ जलाभिषेक यात्रेपूर्वी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. रविवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून 22 जुलैच्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा खंडित राहील. माहिती देताना पोलीस अधीक्षक विजय प्रताप म्हणाले की, प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलले आहे. Due to Jalabhishek Yatra at Noah 24 hours internet service is off, SMS service is also banned

हरियाणाचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) अनुराग रस्तोगी यांनी दिलेल्या आदेशानुसार, जिल्ह्यातील इंटरनेट सेवा रविवारी संध्याकाळी 6 ते सोमवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. आदेशात म्हटले आहे की, नूह जिल्ह्यात तणाव, आंदोलन, सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे नुकसान आणि शांतता आणि सलोखा बिघडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे. व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून चुकीची माहिती आणि अफवा पसरू नये म्हणून ही बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे नूह पोलिसांनी सांगितले. पोलीस अधीक्षक विजय प्रताप यांनी 22 जुलै 2024 रोजी नूह जिल्ह्यात होणाऱ्या ब्रजमंडल जलाभिषेक यात्रेदरम्यान अवजड वाहन चालकांसाठी विशेष सूचना जारी केली आहे.

गेल्या वर्षी 31 जुलै रोजी, हरियाणाच्या नूह जिल्ह्यात विश्व हिंदू परिषदेच्या मिरवणुकीला रोखण्याचा प्रयत्न करताना दोन होमगार्ड कर्मचारी ठार झाले आणि अनेक पोलिसांसह किमान 15 जण जखमी झाले . त्याच रात्री गुरुग्राममधील एका मशिदीवर जमावाने हल्ला करून तेथील नायब इमामाची हत्या केली. या घटनेत सुमारे सहा जणांचा मृत्यू झाला होता.

Due to Jalabhishek Yatra at Noah 24 hours internet service is off, SMS service is also banned

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात