विशेष प्रतिनिधी
मुंबई: आयआयटी मुंबईमध्ये केवळ तांत्रिक कारणांमुळे एका दलित विद्यार्थ्याचा प्रवेश नाकारण्यात आला. त्या विद्यार्थ्यांची काही चूक नसतानाही त्याला प्रवेश मिळू शकला नाही. क्रेडिट कार्ड नीट काम करत नसल्यामुळे तो फि जमा करू शकला नाही. या कारणाने त्याला प्रवेश मिळाला नाही. यासंदर्भात विद्यार्थ्याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
Due to delay in payment of fees a Dalit boy loses his IIT seat
सुप्रीम कोर्टात या संदर्भात सुनावणी सुरू असून आयआयटी मुंबईमध्ये विद्यार्थ्याला प्रवेश घेण्यासाठी संविधानाने दिलेल्या विशेषाधिकाराचा आम्ही वापर करणार असल्याचे न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सांगितले. न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या खंडपीठाने असेही म्हटले की, “कुठलीही चूक नसताना आणि सक्षम असतानाही या विद्यार्थ्यांचा प्रवेश चुकला आहे. आगामी दहा वर्षानंतर हा मुलगा देशाचा नेताही बनू शकतो.” खंडपीठाने जॉइंट सीट अलोकेशन अथोरिटी आणि आयआयटी बॉम्बेतर्फे असलेल्या वकील सोनल जैन यांना २२ नोव्हेंबरपर्यंत आयआयटीमधील जागांबाबत सूचना देणे, तसेच विद्यार्थ्याला सामाविष्ट करून घेण्याच्या शक्यता तपासणे याबाबत मुदत दिली आहे.
IIT ENGINEER ARRESTED :विराट कोहलीच्या मुलीला बलात्कार करण्याची धमकी देणाऱा इंजिनिअर मुंबई पोलिसांच्या ताब्यात
न्यायमूर्ती चंद्रचूड अधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले की, विद्यार्थ्याला अडवून ठेवले जाऊ शकत नाही. त्यामुळे त्याला प्रवेश देण्यासाठी मार्ग शोधला पाहिजे. आयआयटीमध्ये जागा शिल्लक नसेल तर मानवतावादी दृष्टिकोन ठेवून जागा तयार करावी लागेल असेही ते म्हणाले. याचिकाकर्त्याचे नाव प्रिन्स जयबीर सिंग असून त्याने प्रवेश परीक्षेत ८६४ वा क्रमांक मिळवला आहे. “जर त्याला आयआयटी मुंबई मध्ये प्रवेश मिळाला नाही तर त्याची दुसर्या कुठल्याही आयआयटी संस्थेत प्रवेश घ्यायची तयारी आहे.” असे त्याचे वकील अमोल चितळे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App