पंजाबच्या राजकारणात सोमवारी मध्यरात्री खळबळ उडाली. ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने ज्येष्ठ अकाली नेते बिक्रम सिंह मजिठिया यांच्याविरोधात मोहाली पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. हजार कोटींच्या ड्रग्ज रॅकेटप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मजिठियाविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम २५, २७ अ आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Drug smuggling case filed against Akali leader Bikram Singh Majithia in Punjab
वृत्तसंस्था
चंदिगड : पंजाबच्या राजकारणात सोमवारी मध्यरात्री खळबळ उडाली. ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने ज्येष्ठ अकाली नेते बिक्रम सिंह मजिठिया यांच्याविरोधात मोहाली पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. हजार कोटींच्या ड्रग्ज रॅकेटप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मजिठियाविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम २५, २७ अ आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिद्धूंकडून सातत्याने कारवाईची मागणी
अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी काँग्रेसकडून सातत्याने बिक्रम सिंह मजिठिया यांचे नाव घेतले जात होते. विशेष टास्क फोर्सच्या अहवालात बिक्रम मजिठियाचे नाव असल्याचा दावा पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिद्धू यांनी केला होता. मजिठिया यांच्यावर कारवाई करण्याबाबत ते सातत्याने बोलत होते. यामुळे काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये इक्बालप्रीत सहोता यांच्या जागी सिद्धार्थ चटोपाध्याय यांची डीजीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
डीजीपी बदलताच कारवाई
नवीन डीजीपींनी याआधीच बादल कुटुंबाच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केली आहे. डीजीपीची बदली झाल्यानंतर पंजाबमधील हजारो कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणातील हालचालींना मध्यरात्री वेग आला होता. ड्रग्ज प्रकरणात कारवाईसाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे मानले जात होते. याआधी नवज्योत सिद्धू सतत पंजाबमध्ये डीजीपी बदलण्याची मागणी करत होते. मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी साहोता यांच्याबाबत ठाम होते. दरम्यान, ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे संचालक एस. के. अस्थाना यांचे पत्र अचानक लीक झाल्याने सरकारवरील दबाव वाढला आहे.
कारवाईत दिरंगाईवरून उच्च न्यायालयाने फटकारले
पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने पंजाबमधील हजारो कोटींच्या अमली पदार्थांच्या व्यवसायप्रकरणी सुनावणीदरम्यान पंजाब सरकारलाही चांगलेच सुनावले आहे. अंमली पदार्थांच्या व्यापारासंबंधीचा अहवाल सरकारकडे उपलब्ध आहे, त्यावर हायकोर्टाने कोणतीही स्थगिती दिलेली नाही, असे असतानाही सरकारने आजवर कारवाई का केली नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले होते.
पंजाबचे माजी डीजीपी शशिकांत यांनी पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश संजय किशन कौल यांना पत्र पाठवून पंजाबमधील 70 टक्के तरुणांना ड्रग्जचे व्यसन असल्याचे म्हटले होते. काही राजकारणी आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे बड्या ड्रग्ज माफियांना पकडण्यात पोलिसांना यश येत नाही. शशिकांत यांनी या व्यवसायात सहभागी असलेले राजकारणी आणि पोलीस अधिकारी यांची यादी पंजाब सरकारला दिली होती. सरकारकडून कोणतीही कारवाई होत नसताना शशिकांत यांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहून त्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App