महामोर्चातले ड्रोन, आंबेडकर, फातर्फेकर आणि पाटणकर नेमके काय सांगतात?

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाविकास आघाडीचा मोर्चा आणि त्यातली भाषणे प्रत्यक्ष सुरू असताना त्यातले क्लोज अप शॉट आणि ड्रोन शॉट यातला फरक सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यातली हवा काढून घेतली. पण त्या पलिकडे जाऊनही महामोर्चातले ड्रोन चित्र आणि प्रकाश आंबेडकर, आमदार प्रकाश फातर्फेकर आणि नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या वेगवेगळ्या राजकीय कृती मात्र काही वेगळेच सांगून गेल्या आहेत. Drones of Mahamorchat, Ambedkar, Phapankar and Patankar say exactly what

महाविकास आघाडीचा महामोर्चा 3.5 किलोमीटरचा होता. पण त्यामध्ये शिवसेनेचे भगवे झेंडे सर्वाधिक होते. प्रकाश आंबेडकरांनी नेमके नाशिक मध्ये याच मुद्द्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, महामोर्चा प्रामुख्याने शिवसेनेचा होता. काँग्रेस-राष्ट्रवादी नावालाच होते. ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. मी उद्धव ठाकरे यांना त्याच वेळी सांगितले होते, की काँग्रेस – राष्ट्रवादी बरोबर तुम्ही राजकीय आघाडी करा. पण त्यांच्याबरोबर मोर्चात सामील झालात तर सीमा प्रश्नासारख्या मुद्द्यावर तुमच्यावरच खापर फुटू शकते. त्यांच्या पापात तुम्ही वाटेकरी होऊ नका. राष्ट्रवादी काँग्रेस श्रीमंत मराठ्यांचा पक्ष आहे. त्यांना गरीब मराठा सुद्धा चालत नाही. एकनाथ शिंदे मला भेटायला राजगृहावर आले. त्यामुळे त्यांच्याबरोबर इंदू मिल स्मारकासंदर्भात चर्चा झाली. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामील करून घ्यायला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा विरोध आहे. कारण ते सामाजिक दृष्ट्या वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात आहेत. प्रश्न फक्त शिवसेनेचा आहे आणि शिवसेनेला आम्ही युतीची ऑफर दिली आहे. निर्णय उद्धव ठाकरेंनी घ्यायचा आहे, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी नाशिक मध्ये केले.

एकूण महामोर्चा आयोजित करणाऱ्या महाविकास आघाडीत प्रत्यक्षात कसे मतभेद आहेत याचे वर्णन प्रकाश आंबेडकरांनी प्रत्यक्ष महामोर्चा सुरू असताना केले.

 प्रकाश फातर्फेकर ठाकरे गटात नाही

दुसरीकडे ज्या शिवसेनेने आपल्या सर्व नगरसेवक, आमदार, पदाधिकारी यांना मुंबईतल्या 227 प्रभागांमधून प्रत्येकी 2 बस मधून शिवसैनिक महामोर्चात आणायला सांगितले होते. त्यामध्ये ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर सहभागी झाले नसल्याचे बातम्यांमधून उघड झाले आहे. महामोर्चा सुरू असताना प्रकाश फातर्फेकर हे शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या समवेत मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या बाळासाहेब ठाकरे दवाखान्याच्या उद्घाटन समारंभात चेंबूर मध्ये सहभागी झाले होते. ठाकरे गटाचे नगरसेवक अनिल पाटणकर हे देखील त्याच कार्यक्रमात होते.

त्यामुळे प्रत्यक्ष मोर्चा सुरू असताना आणि ठाकरे गटाचा त्या मोर्चात मोठा बोलबाला झालेला असताना प्रत्यक्षात ठाकरे गटाचे आमदार आणि नगरसेवक शिंदे गटात बरोबर काम कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसले. याचा अर्थ प्रत्यक्ष महामोर्चा सुरू असतानाही ठाकरे गटातली गळती आणि शिंदे गटातली भरती थांबली नसल्याचेच स्पष्ट झाले.

 रश्मी ठाकरे मोर्चात चालल्या

वास्तविक महामोर्चात उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण कुटुंब सामील झाले होते. स्वतः रश्मी ठाकरे उद्धव आणि आदित्य यांच्याबरोबरीने महामोर्चात चालल्या. त्यामुळे त्यांचे मराठी प्रसार माध्यमांनी कौतुक केले. पण एकीकडे हा महामोर्चा ठाकरे कुटुंबीयांच्या सहभागात सुरू असताना दुसरीकडे मात्र ठाकरे गटाची गळती मात्र थांबली नसल्याचे दिसले.

Drones of Mahamorchat, Ambedkar, Phapankar and Patankar say exactly what

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात