वृत्तसंस्था
नवी दिल्ली : रोहिंग्यांबाबत (Rohingyas ) म्यानमारमधून पुन्हा एकदा एक वेदनादायक बातमी समोर आली आहे. देश सोडून बांगलादेशात ( Bangladesh ) पळून जाणाऱ्या रोहिंग्यांवर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. यामध्ये महिला, मुले आणि संपूर्ण कुटुंबाचा समावेश आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अनेक लोक आपल्या प्रियजनांच्या शोधात मृतदेहांच्या ढिगाऱ्याजवळ फिरताना दिसले. सोमवारी झालेल्या ड्रोन हल्ल्याचा संदर्भ देत साक्षीदार, कार्यकर्ते आणि एका मुत्सद्द्याने सांगितले की, हा हल्ला शेजारील देश बांगलादेशच्या सीमेवर झाला.
राखीन राज्यातील हा सर्वात प्राणघातक हल्ला असल्याचे वर्णन करताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, एक गर्भवती महिला आणि तिची 2 वर्षांची मुलगीदेखील ठार झाली. या हल्ल्यासाठी मिलिशिया आणि म्यानमार लष्कराने एकमेकांवर आरोप केले आहेत. लोक बांगलादेश सीमा ओलांडण्यासाठी थांबले असताना हा हल्ला झाल्याचा आरोप आहे.
चिखलाने माखलेले मृतदेह दिसतात
रिपोर्टनुसार, सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये चिखलात मृतदेहांचे ढीग विखुरलेले दिसत आहेत आणि त्यांच्या सुटकेस आणि बॅकपॅक त्यांच्या आजूबाजूला पडलेले दिसत आहेत. वाचलेल्यांनी सांगितले की 200 हून अधिक लोक मारले गेले आहेत, तर दुसऱ्याने सांगितले की 70 पेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत.
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, हा हल्ला म्यानमारचे किनारी शहर मंगडॉच्या अगदी बाहेर झाला. 35 वर्षीय मोहम्मद इलियास या साक्षीदाराने सांगितले की, त्याची गर्भवती पत्नी आणि 2 वर्षांची मुलगी या हल्ल्यात जखमी झाल्या आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला. इलियासने सांगितले की, जेव्हा ड्रोनने जमावावर हल्ला करण्यास सुरुवात केली तेव्हा तो त्यांच्यासोबत बीचवर उभा होता.
रोहिंग्या मुस्लिम कोण आहेत?
खरे तर रोहिंग्या मुस्लिम आणि म्यानमारचा बहुसंख्य बौद्ध समुदाय यांच्यातील वाद 1948 मध्ये म्यानमारला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सुरू आहे. 16व्या शतकापासून मुस्लिम राखीन राज्यात राहतात, ज्याला अराकान असेही म्हणतात. हा तो काळ होता जेव्हा म्यानमारमध्ये ब्रिटिशांची सत्ता होती. 1826 मध्ये पहिले अँग्लो-बर्मीज युद्ध संपले तेव्हा अरकानवर ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाली.
याच काळात ब्रिटिश राज्यकर्त्यांनी बांगलादेशातून अराकानमध्ये मजूर आणण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे, शेजारील देश बांगलादेशातून म्यानमारमधील राखीनमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या वाढत गेली आणि हे तेच लोक होते जे बांगलादेशातून राखीनमध्ये स्थायिक झाले आणि आज ते रोहिंग्या मुस्लिम म्हणून ओळखले जातात. रोहिंग्यांची वाढती संख्या पाहून म्यानमारच्या जनरल ने विन यांच्या सरकारने 1982 मध्ये बर्माचा राष्ट्रीय कायदा लागू केला. या कायद्यानुसार रोहिंग्या मुस्लिमांचे नागरिकत्व रद्द करण्यात आले. तेव्हापासून हे रोहिंग्या मुस्लिम अनेक देशांमध्ये आपल्या अस्तित्वासाठी लढत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App