विशेष प्रतिनिधी
तिरुअनंतपूरम : दारू पिल्यावर पोलीसांची भीती बाळगण्याची आता गरज नाही. तळीरामांना दिलासा देणाऱ्या एका निर्णयात केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे की खासगी जागेवर दारू पिणे तोपर्यंत गुन्हा ठरत नाही, जोपर्यंत दारू पिणारे काही उपद्रव करत नाहीत.Drinking alcohol is not a crime unless the drinkers cause trouble, Kerala High Court rules
एका याचिकाकर्त्या विरोधात सुरू असलेली कार्यवाही रद्द करत जस्टिस सोफी थॉमस यांनी म्हटले की, कुणालाही त्रास न देता खासगी ठिकणा मद्यपान करणे गुन्हा ठरणार नाही. केवळ दारूच्या वासाचा अर्थ असा नाही काढला जाऊ शकत, की ती व्यक्ती नशेत होती किंवा दारूच्या प्रभावात होती.
याचिकाकर्त्यावर केरळ पोलीस अधिनियमाच्या कलम ११८(अ) अंतर्गत खटला दाखल करण्यात आला होता. त्याला एका आरोपीची ओळख पटवण्यासाठी पोलीस स्टेशनला बोलावलं गेलं होतं. जिथे तो कथितरित्या दारूच्या नशेत आढळला होता व त्यावर खटला दाखल करण्यात आला.
वकिलांनी युक्तीवाद केला की, याचिकाकर्ता ग्राम सहायक आहे आणि त्याला सायंकाळी ७ वाजता पोलीस स्टेशनला बोलावले गेले होते. पोलीस अधिकाºयांनी त्याच्याविरोधात केवळ यासाठी गुन्हा दाखल केला, कारण तो आरोपीची ओळख पटवण्यात अयशस्वी ठरला व आरोप केले की हा त्याच्याविरोधातील खोटा खटला होता. या आधारावर त्याने चार्जशीट रद्द करण्याची मागणी केली.
न्यायलयाने नमूद केले की, याचिकाकत्यार्ने पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घातला किंवा तो गैरवर्तन केले, असा कोणताही पुरावा नाही. एफआयआरमध्ये एकच आरोप होता की तो दारूच्या नशेत होता आणि त्याचे स्वत:वर नियंत्रण नव्हते.
न्यायमूर्तींनी पुढे असे सांगितले की केरळ पोलीस कायद्याच्या कलम ११८(अ) नुसार दंडनीय गुन्हा सिद्ध करण्यासाठी, एखादी व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी दंगलग्रस्त स्थितीत मद्यधुंद किंवा स्वत: ची काळजी घेण्यास असमर्थ असल्याचे आढळले पाहिजे.
या कायद्यांतर्गत दारू या शब्दाची व्याख्या करण्यात आली नसल्याचेही निदर्शनास आले. या शब्दाचा अर्थ तपासण्यासाठी, न्यायालयाने अॅडव्हान्स लॉ लेक्सिकॉनवर विश्वास ठेवला. तसेच, न्यायालयाने ब्लॅकच्या लॉ डिक्शनरीचा देखील हवाला दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App