“तो” असा नव्हताच; दिल्ली स्फोटातील संशयित डॉ. उमर मोहम्मदच्या कुटुंबीयांचे victim card खेळायला सुरुवात!!

Dr Umar Un Nabi

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीच्या लाल किल्ल्यापाशी झालेल्या स्फोटातला प्रमुख संशयित डॉ. उमर मोहम्मद याच्या विषयी पोलिसांनी वेगवेगळ्या तपासणी करण्यात असून तपास करत आहेत पण तेवढ्यात जम्मू काश्मीर मधून त्याच्या कुटुंबीयांनी मात्र victim card खेळायला सुरुवात केली आहे.

उमर मोहम्मदच्या तारा जैश ए मोहम्मद आणि अन्सार गजवात ए हिंद या दहशतवादी संघटनांची जोडल्या गेल्याची प्राथमिक माहिती तपास यंत्रणांना मिळाली. त्या पाठोपाठ तपास यंत्रणांनी उमर मोहम्मद याची वेगवेगळी कनेक्शन्स खाण काढायला सुरुवात केली. तो जम्मू कश्मीर मधला रहिवासी असल्याचे उघड झाले. तपास यंत्रणा त्याच्या घरापर्यंत पोहोचल्या. उमर मोहम्मद याची बहिण मुजमीला हिच्या नवऱ्याला तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले. त्याचबरोबर त्याच्या अन्य नातेवाईकांकडे सुद्धा तपास यंत्रणा पोहोचल्या.

याच दरम्यान उमर मोहम्मदची बहिण मुजमीला हिने victim card खेळायला सुरुवात केली. उमर मोहम्मद असा कधी नव्हताच. त्याच्या शिक्षणासाठी आम्ही खूप खर्च केला. तो चांगला शिकेल. डॉक्टर बनेल. जम्मू काश्मीरच्या जनतेची सेवा करेल काही कमाई करून सगळ्या कुटुंबाचे पालनपोषण करेल असे आम्हाला वाटले होते. तो दिल्लीत राहत होता. तो घरी यायचा, त्यावेळी जास्तीत जास्त क्रिकेट खेळायचा. माझ्या मुलांवर प्रेम करायचा. तो स्फोटके बनवेल आणि दहशतवादी कृत्य करेल याच्यावर माझा विश्वासच नाही, असे वक्तव्य मुजमीला हिने पत्रकारांशी बोलताना केले.

– काश्मिरी पत्रकारांच्या games

काश्मीर मधल्या पत्रकाराने सुद्धा “डॉक्टर साहेब” इधर आकर क्या क्या करते थे??, असा सवाल “आदरपूर्वक” विचारला. त्यावेळी मुजमेला हिने वर उल्लेख केलेले उत्तर दिले. उमर मोहम्मद हा डॉक्टरकीचे शिक्षण घेऊन सुद्धा दहशतवादी बनला. त्याचा उल्लेख आपण आदरपूर्वक करता कामा नये, याचे साधे भान सुद्धा काश्मीरी पत्रकाराला राहिले नाही.

Dr Umar Un Nabi – a suspect in the blast near Red Fort

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात