वृत्तसंस्था
मुंबई : Dr. Poonam Gupta सरकारने पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्या डॉ. पूनम गुप्ता यांची भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे. पूनम यांचा कार्यकाळ ३ वर्षांचा असेल.Dr. Poonam Gupta
त्या जानेवारीमध्ये राजीनामा दिलेल्या डेप्युटी गव्हर्नर मायकेल पात्रा यांची जागा घेतील. कॅबिनेट नियुक्ती समितीने पूनम यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. ५ एप्रिल रोजी होणाऱ्या आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीपूर्वी ही नियुक्ती करण्यात आली आहे.
पूनम सध्या एनसीएईआर (नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च) च्या संचालक आहेत आणि १६व्या वित्त आयोगाच्या सदस्यादेखील आहेत. याआधी, त्या NITI आयोगाच्या विकास सल्लागार समिती आणि FICCI च्या कार्यकारी समितीच्या सदस्या होत्या.
११ डिसेंबर रोजी संजय मल्होत्रा नवीन गव्हर्नर बनले
यापूर्वी ९ डिसेंबर रोजी सरकारने महसूल सचिव संजय मल्होत्रा यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे नवे गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली होती. ते आरबीआयचे २६ वे गव्हर्नर आहेत. गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा कार्यकाळ 10 डिसेंबर 2024 रोजी संपत होता. मल्होत्रा यांनी 11 डिसेंबरपासून गव्हर्नरपदाची सूत्रे स्वीकारली.
संजय मल्होत्रा हे वित्त आणि कर आकारणीतील तज्ज्ञ आहेत
१९९०च्या बॅचचे राजस्थान केडरचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी संजय मल्होत्रा यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूर येथून संगणक विज्ञानात अभियांत्रिकी पदवी आणि अमेरिकेतील प्रिन्सटन विद्यापीठातून सार्वजनिक धोरणात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
मल्होत्रा यांनी वीज, वित्त आणि कर, माहिती तंत्रज्ञान आणि खाण यासह विविध क्षेत्रात काम केले आहे. त्यांना ३३ वर्षांहून अधिक अनुभव आहे.
अर्थ मंत्रालयात सचिव (महसूल) म्हणून काम करण्यापूर्वी, त्यांनी भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागात सचिवपद भूषवले. मल्होत्रा यांना राज्य आणि केंद्र सरकारच्या पातळीवर वित्त आणि कर आकारणीमध्ये तज्ज्ञ आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App