डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष पर्यटक सर्किट ट्रेनचे 14 एप्रिलला उद्घाटन

प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रीय संस्कृती महोत्सव यावेळी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. मुंबईत आझाद मैदानात राष्ट्रीय संस्कृती महोत्सव 2023 चे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या हस्ते शनिवारी झाले. मुंबईत चर्चगेट येथील आझाद मैदानात 11 ते 19 फेब्रुवारी दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक देवाणघेवाणीद्वारे राष्ट्रीय ऐक्य आणि एकात्मतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. Dr. Babasaheb Ambedkar Special Tourist Circuit train inaugurated on 14 April

विशेष पर्यटक सर्किट ट्रेन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिलपासून बाबासाहेब आंबेडकर विशेष पर्यटक सर्किट ट्रेनचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची घोषणा भारत सरकारचे केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांनी यावेळी केली.

या महोत्सवात मुंबईकरांसाठी सुमारे 1000 कलाकार आपला कलाविष्कार सादर करणार आहेत. सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध पर्यटन स्थळे, संस्था, उत्सव, नृत्य चित्रपटांसह हे शहर प्राचीन परंपरा आणि आधुनिकतेचा संगम आहे. संस्कृतीच्या माध्यमातून भारतातील विविधतेचा उत्सव करून राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांनी दिली. या महोत्सवामुळे आपली समृद्ध संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचेल आणि आपल्या लोकांमध्ये स्वदेशी संस्कृती आणि कलेबद्दल कौतुक आणि प्रेम पुन्हा जागृत होईल. आम्ही व्होकल फॉर लोकल म्हणजेच स्थानिक उत्पादनांनाही प्रोत्साहन देत आहोत. सरकारने आपल्या तीर्थक्षेत्रांचा विकास मोठ्या प्रमाणावर हाती घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.

सांस्कृतिक मंत्रालय दरवर्षी भारतातील विविध राज्यांमध्ये या महोत्सवाचे आयोजन करते. 2019 मध्ये मध्य प्रदेशात, 2022 मध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आणि आता महाराष्ट्रात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Dr. Babasaheb Ambedkar Special Tourist Circuit train inaugurated on 14 April

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात