खतांच्या किंमती कोणत्याही परिस्थितीत वाढवू नका असे आदेश केंद्र सरकारने खत कंपन्यांना दिले आहेत. यामध्ये रासायनिक खतांचाही समावेश आहे.त्याचबरोबर पोटॅश आणि फॉस्फेटिक खतांसाठीची सबसिडीही कायम राहणार आहे.Don’t raise fertilizer prices, Centre’s orders to fertilizer companies, subsidy to provide relief to farmers will also remain
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : खतांच्या किंमती कोणत्याही परिस्थितीत वाढवू नका असे आदेश केंद्र सरकारने खत कंपन्यांना दिले आहेत. यामध्ये रासायनिक खतांचाही समावेश आहे.त्याचबरोबर पोटॅश आणि फॉस्फेटिक खतांसाठीची सबसिडीही कायम राहणार आहे.
रसायन आणि खते विभागाचे राज्य मंत्री मनसुख मांडविय यांनी खत कंपन्यांची बैठक घेतली. यामध्ये त्यांनी केंद्राच्या निर्णयाची माहिती दिली. जुन्याच दराने खतांची विक्री करावी, असे त्यांनी सांगितले.
मांडविय म्हणाले की, देशात खतांच्या किंमतीत वाढ होत आहे. त्याचबरोबर शेतकºयांना वेळेवर खतेही उपलब्ध होत नाहीत. या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये खत कंपन्यांना किंमती वाढवू नयेत असे सांगितले. कंपन्यांनीही याला मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात आणि जुन्याच भावाने खतांचा पुरवठा करण्यास सहमती दर्शविली आहे.
इफकोसह अनेक बड्या कंपन्यांनी गुरूवारी खतांच्या किंमतीमध्ये मोठी वाढ जाहीर केली होती. अमोनियअम फॉस्फेट आणि इतर फॉस्फेट खतांसाठी लागणाऱ्या कच्चा मालाच्या किंमतीत आंतरराष्टीय बाजारात वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला होता.
खत कंपन्यांकडे असलेला जुना साठा त्यांना जुन्याच भावाने विकावा लागणार आहे. मात्र, गेल्या वर्षीची सबसिडी कायम राहणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. नायट्रोजन खतांवर १८.७८ रुपये प्रति किलो, फॉस्फेटसाठी १४.८८ रुपये प्रति किलो आणि सल्फरसाठी १०.११ रुपये प्रति किलो अशी सबसिडी दिली जाते.
हे ही वाचा
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App