विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देणगीदारांनी दिलेला निधी वैयक्तिक उपयोगासाठी वळवल्याच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पत्रकार राणा अय्युब यांची १.७७ कोटी रुपयांहून अधिकच्या संपत्तीवर टाच आणली आहे.Donor’s fund used for self, ED heels Rs 1.77 crore assets of journalist Rana Ayub
राणा अय्युब यांच्यासह त्यांच्या कुटुंबाच्या नावे असलेली एक मुदती ठेव आणि बँकेतील शिल्लक रक्कम जप्त करण्यासाठी या यंत्रणेने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याखाली (पीएमएलए) एक हंगामी आदेश जारी केला.
राणा अय्युब यांना धमार्दाय कारणासाठी लोकांकडून मिळालेल्या निधीतील कथित अनियमिततांच्या संबंधात गाझियाबाद पोलिसांनी सप्टेंबर २०२१ मध्ये दाखल केलेल्या एका एफआयआरवर आर्थिक गैरव्यवहाराचे हे प्रकरण आधारित आहे. केंद्रीय तपास संस्थेने अय्युब यांच्यावर देणगी म्हणून मिळालेल्या पैशाचा वैयक्तिक खचार्साठी वापर केल्याचा आरोप केला आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांनी सप्टेंबरमध्ये दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने गेल्या वर्षी अय्युब यांच्याविरुद्ध चौकशी सुरू केली होती. पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत, तक्रारदार विकास सांकृत्यायन यांनी आरोप केला होता की, राणा अय्युब यांनी केट्टोसंबंधीत मदत निधी मोहिमेद्वारे बेकायदेशीरपणे सार्वजनिक पैसे मिळवले होते. त्यांनी कथितपणे 3 सामाजिक कामासाठी दिलेल्या देणग्या योग्य हेतूसाठी वापरल्या नाहीत. देणग्यांचा काही भाग कथितपणे वैयक्तिक खचार्साठी वापरला गेला, असा आरोप ईडीचे अधिकारी करत आहेत
ईडी आणि आयकर विभाग दोन्ही या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची चौकशी करत आहेत. ईडीने दावा केला आहे की अय्युब यांना एफसीआरए (फॉरेन कंट्रीब्युशन रेग्युलेशन अॅक्ट) अंतर्गत कोणतीही मान्यता न घेता परदेशी देणग्या मिळाल्या आहेत. परदेशातून कोणताही देणगी घेण्यापूर्वी मान्यता घेणे अनिवार्य आहे.
२०१६ मध्ये राणा अयुब यांनी गुजरात फाईल्स हे पुस्तक प्रकाशित केले होते. हे पुस्तक २००२ साली गुजरात मध्ये गोध्रा येथे झालेल्या हिंदू हत्याकांडातून उसळलेल्या दंगलीवर लिहिले आहे. या पुस्तकात गुजरात दंगलीचे सत्यशोधन केल्याचा दावा केला गेला. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहमंत्री अमित शहा यांच्या वर या दंगलीच्या माध्यमातून मुस्लिमांवर अन्याय केल्याचा आरोप केला गेला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App