विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतातल्या मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यासाठी USAID मधून 21 मिलियन डॉलर्स दिल्याच्या आरोपावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ठाम राहिले. त्यांनी त्या आरोपाचा तिसऱ्यांदा पुनरुच्चार केला.
अमेरिकेतल्या वेगवेगळ्या राज्यांमधल्या रिपब्लिकन पार्टीच्या गव्हर्नर्सच्या बैठकीत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचा पैसा लोकशाहीच्या नावाखाली कसा उधळला गेला, याची यादीच वाचून दाखवली. भारतामध्ये मतदान वाढायला हवे यासाठी अमेरिकेतून 21 मिलियन डॉलर खर्च केले. भारतातले मतदान वाढवायची काळजी अमेरिकेला का असावी??, अमेरिकेत असे मतदान वाढायला नको का??, असे सवाल त्यांनी केले.
इतकेच नाही, तर डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशातल्या “लोकशाही व्यवस्थापना”साठी 29 मिलियन डॉलर्स USAID मधून खर्च केल्याचाही आरोप केला. 10000 मिलियन डॉलर्स इकडे – तिकडे खर्च केल्याचे समजू शकतो, पण 29 मिलियन डॉलर्स बांगलादेशातल्या लोकशाही व्यवस्थापनासाठी खर्च करायची काय गरज होती??, असा सवाल देखील त्यांनी केला.
21 मिलियन डॉलर्स आणि 29 मिलियन डॉलर्स या आकड्यांची त्यांनी गल्लत केली नाही. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या तथाकथित इन्वेस्टीगेस्टिव्ह रिपोर्ट मध्ये भारताला 21 मिलियन डॉलर्स दिले नसून ते बांगलादेशाला दिले असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी इंडियन एक्सप्रेसची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर शुक्रवारी रिपब्लिकन गव्हर्नर्सच्या बैठकीत USAID बद्दल पुन्हा टीकेची झोड उठवत 21 मिलियन डॉलर्स भारतातल्या मतदान वाढीसाठीच म्हणजेच मतदानात हस्तक्षेप करण्यासाठी दिल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App