विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : Donald Trump अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे. न्यूयॉर्क येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भाषण करताना त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबवण्यात आपली भूमिका असल्याचे सांगत स्वतःला “शांतिदूत” म्हणत शांततेचे नोबेल पारितोषिक आपल्याला मिळायला हवे होते असेही ट्रम्प म्हणाले.Donald Trump
सुमारे १५ मिनिटे ठरलेल्या वेळेत तब्बल ५५ मिनिटे चाललेल्या त्यांच्या भाषणात ट्रम्प यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. त्यांनी थेट वल्गना केली की, “जगात सुरू असलेली सात युद्धे थांबवण्याची जबाबदारी संयुक्त राष्ट्रांची होती. पण ती सर्व मीच थांबवली. त्यासाठी मला नोबेल शांतता पुरस्कार मिळायला हवा होता. माझे ध्येय पुरस्कार नव्हे, तर जीव वाचवणे आहे.”Donald Trump
ट्रम्प यांनी याआधीही अनेकदा भारत-पाकिस्तान युद्ध थांबवण्याचा दावा केला आहे. २०१९ मध्ये काश्मीर मुद्द्यावरही त्यांनी मध्यस्थीची तयारी दर्शवली होती. मात्र भारताने तेव्हा ठामपणे नकार दिला होता. तरीही ट्रम्प सातत्याने हा दावा करत राहतात.
युरोपमध्ये वाढलेली स्थलांतरितांची संख्या गंभीर संकट निर्माण करत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. “अनधिकृत प्रवेश करणाऱ्यांना शिक्षा दिल्यामुळे बेकायदेशीर प्रवेश थांबला,” असा त्यांचा दावा होता. एकतर्फी मान्यता देणे म्हणजे हमासला बक्षीस देण्यासारखे आहे, असे म्हणत त्यांनी इस्रायलच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला.
युरोप रशियाकडून तेल-गॅस खरेदी करत असताना युद्ध रशियाशीच चालवते, अशी टीका ट्रम्प यांनी केली. भारत आणि चीन रशियाकडून तेल खरेदी करून अप्रत्यक्षपणे युक्रेन युद्धाला निधी पुरवत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. अमेरिकेची अर्थव्यवस्था जगातील सर्वात मजबूत असल्याचा दावा करताना ट्रम्प यांनी कार्बन फूटप्रिंट कमी करण्याची गरज अधोरेखित केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App