Hard Facts : डोनाल्ड ट्रम्पच्या भारताला शिव्या, राहुल गांधींनी गायल्या ट्रम्पच्या ओव्या; तरी अमेरिकेला भारताबरोबर व्यापार करार हवा!!

डोनाल्ड ट्रम्प च्या भारत आला शिव्या राहुल गांधींनी गायल्या ट्रम्पच्या ओव्या; तरी अमेरिकेला भारताबरोबर व्यापार करार हवा!!, ही खरं म्हणजे राजाकीय वस्तुस्थिती आज समोर आली. Donald Trump

ट्रम्पच्या शिव्यांवर राहुल गांधी खुश

भारताबरोबरचा व्यापार करार अमेरिकेच्या हिशेबाने होत नाही म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांना फ्रस्ट्रेशन आले असल्याची कबुली त्यांच्याच प्रशासनातल्या अधिकाऱ्याने दिली. युरोप मधले प्रगत देश, जपान हे सगळे अमेरिकेपुढे झुकत असताना भारत, चीन आणि रशिया हे तीनच देश अमेरिकेचे ऐकत नाहीत. अमेरिकेच्या हितानुसार व्यापार करार करत नाहीत म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांना फ्रस्ट्रेशन आले. म्हणून ते वाट्टेल ते बरळू लागले. आपल्या ट्रूथ अकाउंट वर वाट्टेल तसे लिहू लागले. त्यांनी 25% टेरिफ लावला भारताला दंड करून म्हणाले.

पण एवढे होऊन देखील भारत बधला नाही म्हणून डोनाल्ड ट्रम्प भारत आणि रशिया यांना नष्ट होत चाललेल्या अर्थव्यवस्था म्हणाले. त्याबरोबर इकडे राहुल गांधींना आनंद झाला. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. डोनाल्ड ट्रम्प बरोबरच बोलले तुम्हालाच माहिती नाही का??, भारतातली अर्थव्यवस्था नष्ट होत चाललीय??, असा खोचक सवाल पत्रकारांना करून राहुल गांधींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या ओव्या गायल्या. भारताची अर्थव्यवस्था नष्ट होत चालल्याचे सगळ्या जगाला आणि देशातल्या नागरिकांना माहिती आहे फक्त ते पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांना माहिती नाही. त्यांनीच अदानींना मदत करण्यासाठी देशाची अर्थव्यवस्था नष्ट केली, असे टोमणे राहुल गांधींनी मारले.

कालच ते डोनाल्ड ट्रम्प खोटारडे असल्याचे म्हणाले होते पण आज त्यांनी पलटी मारली आणि डोनाल्ड ट्रम्प यांची स्तुती केली.



मोदींनी हिंग लावूनही नाही विचारले

पण भारताला शिव्या देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेला भारताबरोबर अजूनही व्यापार करार करायचा आहे. भारत नष्टप्राय झालेली अर्थव्यवस्था असताना भारताबरोबर मुक्त व्यापार करार करण्यासाठी अमेरिका धाय मोकलती आहे. त्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय संकेतांची सगळी भाषा गुंडाळून व्हाईट हाऊस मधल्या खुंटीला टांगून ठेवली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या न झालेल्या युद्धबंदीचे त्यांनी 30 वेळा क्रेडिट घेतले. पण ते भारत सरकारकडून एकदाही ट्रम्प यांनी युद्धबंदी केली, असे वदवून घेऊ शकले नाहीत. अगदी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना डिवचले तरीदेखील मोदींनी ट्रम्प यांचे नाव घेतले नाही. त्यांनी ट्रम्प यांना हिंग लावून विचारले नाही.

शिव्यांचा दुष्परिणाम अमेरिकेवर जास्तअमेरिकेवर जास्त

एवढे सगळे होऊनही भारत आणि अमेरिका यांच्यातल्या व्यापार वाटाघाटी थांबलेल्या नाहीत त्या थांबण्याची शक्यता नाही कारण कुणाला फ्रस्ट्रेशन आले किंवा कुणीही काहीही बरळले, दोन मोठ्या देशांमधल्या व्यापारापासून संरक्षणापर्यंत कुठल्याही वाटाघाटी थांबत नसतात त्या आपल्या गतीने पुढेच चालत असतात वळणे घेऊन खाचखळगे दूर करत असतात. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला शिव्या दिल्या, तर भारत उलट्या शिव्या देईल, आणि ट्रम्प राहुल गांधी यांच्या जाळ्यात अडकेल याची सुतराम शक्यता नाही. त्या उलट भारत अधिक कठोर आणि वास्तववादी भूमिका घेऊन अमेरिकेशी व्यापार वाटाघाटी करेल आणि आपल्या काही अटी शर्ती ही मान्य करवून घेईल, याचीच शक्यता दाट आहे. कारण आंतरराष्ट्रीय राजकारणात नुसती बडबड चालत नाही, तर ठोस कृती लागते, हे डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा अमेरिकन प्रशासनाला आणि भारतातल्या मोदी सरकारला जास्त कळते.

Donald Trump abused India, Rahul Gandhi praise Donald Trump, but America needs free trade agreement with India

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात