विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: दिल्लीत लॉकडाऊनची घोषणा होताच दारुचा स्टॉक करून ठेवण्यासाठी डॉली आंटी दारुच्या दुकानात आल्या होत्या. या आंटीने एएनआयला सांगितले होते इंजेक्शनचा फायदा होणार नाही, ही दारू मात्र फायदा करेल. मला औषधांनी फरक पडणार नही, पेगने फरक पडेल.त्यांचा तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता.आता परत एकदा आंटीची जोरदार चर्चा सुरू आहे.
दिल्लीतील डॉली आंटीने पुन्हा एकदा सरकारला दारुचे गुत्ते उघडण्याचं आवाहन केलं आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवालजी, गुत्ते उघडा. मग पाहा दारू आत आणि कोरोना बाहेर जाईल, त्यामुळे तुमची डोकेदुखीही कमी होईल, असं या आंटीने म्हटलं आहे. या आंटीचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. dolly aunty demand to open liquor shop in Delhi
#Dolly #aunty – pic.twitter.com/oyqGW0vYfr — Mahender Singh Manral (@mahendermanral) April 26, 2021
#Dolly #aunty – pic.twitter.com/oyqGW0vYfr
— Mahender Singh Manral (@mahendermanral) April 26, 2021
कोरोनाने हजारो लोकांचे जीव जात असताना त्या बरळल्या की, हॉस्पिटलमध्ये जे बेड आणि ऑक्सीजन कमी पडत आहे. त्या समस्येचं समाधान आहे दारूचं दुकान. दोन पेग कुणी लावले तर कोरोना मरेल. पेग आत जाईल तर कोरोना बाहेर येईल’. अशी मागणी करत या बाईने पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडले आहेत.
जर दारूची दुकाने सुरू झाली तर हॉस्पिटलमधील बेड रिकामे होतील आणि केजरीवाल सरकारला अडचणी येणार नाही. ऑक्सीजन सिलेंडरची समस्या दूर होईल. पिणाऱ्या लोकांच्या आत दारू गेली तर कोरोना आपोआप बरा होईल, असंही मूर्खासारखं लॉजिक त्यांनी लावलं .
व्हायरल व्हिडीओमध्ये अरविंद केजरीवाल यांनी अपील करत महिला म्हणाली की, तुम्ही दारूची दुकाने सुरू करा. लोक वाचतील. तुमची डोकेदुखी कमी होईल. दारू आत गेली तर कोरोना बाहेर येईल.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मी रोज पेग घेत आहे. परंतु आता स्टॉक संपला आहे, असंही त्यांनी सांगितलं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App