भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारनामाला दिलेल्या विशेष मुलाखतीत अमेठी लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या हातून निसटू शकतो, तर बारामती राष्ट्रवादीच्या हातून का नाही निसटू शकणार??, असा परखड सवाल करत बारामती राष्ट्रवादीच्या हातून निसटेल, असे भाकीत वर्तवले आहे. अर्थातच बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्याची भाजपची महत्त्वकांक्षा आहे. त्या दृष्टीनेच त्यांचे जोरकस प्रयत्न आहेत. केंद्रातून दस्तुरखुद अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना बारामती लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक नेमले आहे. त्यांचे अनेक संघटनात्मक कार्यक्रम बारामती लोकसभा मतदारसंघात झाले आहेत. शिवाय लोकसभा मतदारसंघ अंतर्गत विधानसभा मतदारसंघांचे प्रमुख देखील भाजपने नेमले आहेत. भाजपची मजबूत संघटनात्मक बांधणी यावर पक्षाचा भर आहे. Does sharad pawar plans escape root for supriya sule from baramati to avoid defeat??
अमेठी सारख्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात जर राहुल गांधींचा पराभव होऊ शकतो, तर पवारांच्या बारामतीच्या बालेकिल्ल्यात त्यांच्याच कन्येचा पराभव का नाही होऊ शकत??, असा भाजप नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आहे.
पण बारामती मतदारसंघाबाबत मात्र काही वेगळे राजकीय संकेत मिळत आहेत, ते म्हणजे बारामती मतदारसंघ पवारांच्या ताब्यातून हिसकावून घ्यायचा हा जसा भाजपने चंग बांधला आहे, तसा बारामती मतदारसंघ निसटला तरी, भाजपने तो पवारांच्या हातून हिसकावून घेतल्याचा आनंद भाजपला मिळू द्यायचा नाही, असा मनसूबा पवारांनी असल्याचे राजकीय संकेत मिळत आहेत!!… आणि अर्थातच ते सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामतीतून “एस्केप रूट” तयार करण्याचे आहेत. सर्वसामान्यांच्या भाषेत याला “पलायन” म्हणतात!!
पवारांचा माढा “एस्केप रूट”
शरद पवारांनी हा प्रयोग स्वतःच्याच बाबतीत 2014 मध्ये केला होता. निवडणुकीच्या गणितात पवार माहीर मानले जातात. पवारांचा राजकीय हवामानाचा अंदाज अचूक असतो. 2014 ची मोदी लाट सर्वसामान्य जनतेने ओळखण्या आधीच पवारांनी ओळखली होती आणि त्यामुळे पवारांनी स्वतःच निवडलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेत राज्यसभेचा “एस्केप रूट” निवडला होता. अर्थात पवारांच्या स्टाईलनुसार त्याला वेगळा राजकीय मुलामा जरूर देण्यात आला, तो म्हणजे आपण आत्तापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आणि जिंकलो आहोत. त्यामुळे आता लोकसभेची जागा तरुण नेतृत्वाला मोकळी करून देऊन आपण राज्यसभेत जात आहोत, असे तेव्हा पवार म्हणाले होते. पण पवार राज्यसभेत पोहोचल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या हातातून निसटला ही वस्तुस्थिती आहे. दरम्यानच्या काळात फक्त एक टर्म विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीचे माढातून खासदार होते. आता तिथे रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या रूपाने भाजपचे पवार विरोधक खासदार आहेत आणि स्वतः विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे चिरंजीव दोघेही भाजपमध्ये आहेत. अर्थात पवारांनी माढातून “एस्केप रूट” शोधण्यापूरतीच ही स्टोरी आहे!!
बारामतीतून सुप्रियांचा “एस्केप रूट”
पण हीच स्टोरी सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत बारामतीतून रिपीट होऊ शकते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ज्या पद्धतीने बारामती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून हिसकावून घेण्यासाठी राजकीय व्यूहरचना केली आहे, त्याचा अंदाज पवारांसारख्या चाणाक्ष नेत्याला निश्चित आला आहे. त्यामुळेच पवारांनीही बारामती “सरप्राईज एलिमेंट” म्हणून सुप्रिया सुळे यांच्या ऐवजी लोकसभा निवडणुकीत वेगळाच अराजकीय उमेदवार उतरविण्याची तयारी चालवल्याचे संकेत मिळत आहेत. तसेही भूमाता ब्रिगेड संघटनेच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी दाखवलीच आहे. अर्थात ती त्यांची “सर्वपक्षीय” तयारी आहे. म्हणजे सुप्रिया सुळे यांचा मतदारांना कंटाळा आला आहे, त्यामुळे आपल्याला राष्ट्रवादीने अथवा भाजपने कोणीही उमेदवारी द्यावी. आपण लोकसभा निवडणूक लढवू, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. याचा अर्थ पवारांच्या मनात त्याच उमेदवार असतील, असे नाही पण यातून सुप्रिया सुळे यांच्यासाठी “एस्केप रूट” मात्र निश्चित तयार होऊ शकतो.
विधानसभेचा मार्ग मोकळा
तसेही सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष पदी नेमून पवारांनी त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेचा वेगळा मार्ग मोकळा करूनही दिला आहे. यात सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्रातल्या वेगळ्याच एखाद्या मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीत उतरवण्याची रणनीती सुद्धा असू शकते. याचा अर्थ सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघ ऐवजी वेगळ्याच मतदारसंघातून विधानसभेच्या मैदानात उतरू शकतात. म्हणजेच बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्याऐवजी दुसराच उमेदवार देऊन पवार पवारांच्या हातून बारामती हिसकावून घेण्याचा भाजपचा आनंद शरद पवार हिरावून घेऊ शकतात.
“एस्केप रूट” दिल्लीवर अवलंबून
अर्थात आज तरी या सर्व राजकीय संकेतांच्या गोष्टी आहेत. पवार तसेही “अनप्रेडिक्टेबल” पॉलिटिशिअन” म्हणून ओळखले जातात. पण पवारांसाठी “अनप्रेडिटटेबल” या इंग्रजी शब्दाचा अर्थ मराठीत “बेभरवशाचा” असा आहे. अर्थात पवार कितीही “अनप्रेडिक्टेबल पॉलिटिशिअन” असले तरी त्यांच्या पेक्षाही “अनप्रेडिक्टेबल पॉलिटिशिअन” दिल्लीच्या गादीवर बसले आहेत. आणि त्यांच्यासाठी मात्र “अनप्रेडिक्टेबल” या शब्दाचा अर्थ “बेभरवशाचा” अजिबात नाही. उलट ते जो “कार्यक्रम” करतील, ते तो खात्रीनेच करतील, अशी त्यांची आंतरराष्ट्रीय ख्याती आहे. त्यामुळे पवार काय करतात, यापेक्षा दिल्लीत बसलेले “बॉस” काय करतात?, यावर सुप्रिया सुळे यांच्या “एस्केप रूटचे” भवितव्य अवलंबून आहे, हे मात्र निश्चित!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App