वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कफ सिरपच्या दुष्परिणामामुळे तीन मुलांचा मृत्यू साडेचार महिन्यांपूर्वी झाला होता. याबाबतच्या तपास अहवालात मुलांना डेक्स्ट्रोमेथोरफान सिरप देण्यात आल्याचे समोर आले आहे. त्याच्या विषबाधेमुळे ३ मुलांचा मृत्यू झाला, असे उघड झाल्याने चार वर्षांखालील मुलांना डेक्स्ट्रोमेथोरफान सिरप देऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत. Do not give Dextromethorphan syrup to children under four ; Order of the Central Government
केंद्र सरकारच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाने दिल्ली सरकारच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाला याबाबतचे आदेश नुकतेच दिले आहेत. त्यात म्हंटले आहे की, मोहल्ला क्लिनिक्स/दवाखान्यांना चार वर्षांखालील मुलांना हे सिरप न देण्याबाबत नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत.
खोकला आल्यावर हे सिरप मोहल्ला क्लिनिकमधील मुलांना देण्यात आले. प्रकृती खालावल्याने १६ मुलांना कलावती सरन रुग्णालयात दाखल केले. त्यातील तिघांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने (सीडीएससीओ) सिरपची तपासणी केली. या चाचणीत सिरपचा दर्जा चांगला आढळला नाही. यामुळेच डीजीएचएसने डेक्सट्रोमेथोरफन सिरप तात्काळ मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App