द्रमुक नेत्याचे देश-धर्मावर पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, भरसभेत ए. राजा म्हणाले- भारताला देशच मानत नाही!

विशेष प्रतिनिधी

चेन्नई : तामिळनाडूतील द्रमुकचे खासदार ए. राजा यांनी भारताला देश म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आहे. ते म्हणाले की, भारत हा कधीच देश नव्हता. देश म्हणजे एक भाषा, एक संस्कृती आणि एक परंपरा. मग त्याला देश म्हणतात. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या वाढदिवसानिमित्त 3 मार्च रोजी कोईम्बतूर येथे झालेल्या सभेत ए. राजा यांनी हे वक्तव्य केले. DMK leader’s controversial statement on country and religion again, A. Raja – India is not considered as a country!

काय म्हणाले ए. राजा….

ए. राजा म्हणाले, “भारत हा एक उपखंड आहे. याचे कारण काय आहे? तामिळनाडू हा देश आहे. मल्याळम एक भाषा आहे, एक राष्ट्र आहे आणि एक देश आहे. ओडिशा एक देश आहे, तिथे एक भाषा आहे. केरळमध्ये वेगळी आणि दिल्लीत वेगळी भाषा आणि संस्कृती आहे. हे सर्व देश मिळून भारत बनवतात. त्यामुळे भारत हा देश नसून एक उपखंड आहे.”

ए. राजा म्हणाले, “मणिपूरमध्ये कुत्र्याचे मांस खाल्ले जाते, का? होय, ते खातात. ही त्यांची संस्कृती आहे. त्यात काहीही चुकीचे नाही. हे सर्व आपल्या मनात आहे. काश्मीरमध्ये वेगळी संस्कृती आहे. ते तुम्हाला स्वीकारावे लागेल. जर एखाद्या समुदायाने गोमांस खाल्ले तर तुमची समस्या काय आहे? त्याने तुम्हाला खाण्यास सांगितले काय? विविधतेत एकता. हे मान्य करा आपल्यात मतभेद आहेत.”

द्रमुकचे नेते ए राजा व्हिडिओमध्ये असे म्हणताना दिसत आहेत की, जर तुम्ही म्हणाल हाच तुमचा देव आणि भारत माता की जय, तर आम्ही ते देव आणि भारत माता कधीच स्वीकारणार नाही. त्यांना सांगा, आम्ही सर्व रामाचे शत्रू आहोत. मी रामायण आणि भगवान राम मानत नाही. ए. राजाने यांनी भगवान हनुमानाची तुलना माकडाशी केली आणि ‘जय श्री राम’चा नारा घृणास्पद असल्याचे म्हटले.

ए. राजा म्हणाले, “पाणी पाण्याच्या टाकीतून स्वयंपाकघरात तसेच शौचालयात येते. ते पाणी आपण स्वयंपाकघरात वापरतो, पण शौचालयातून आणलेले पाणी स्वयंपाकघरात वापरत नाही. याचे कारण काय? ही एक मानसिक समस्या आहे. पाणी तेच आहे पण ते कुठून येत आहे याने काय फरक पडतो. आम्हाला माहिती आहे की हे स्वयंपाकघर आहे आणि हे शौचालय आहे.”

भाजपचा सवाल- द्रमुक दुसऱ्या धर्माचा अपमान कसा करू शकतो?

भाजप खासदार रविशंकर प्रसाद म्हणाले की, द्रमुक नेते म्हणतात की आम्ही ‘जय श्री राम’ आणि ‘भारत माता की’ कधीही स्वीकारणार नाही. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हे मान्य करतात का? द्रमुक इतर धर्माच्या देवतांच्या विरोधात अशा अपमानास्पद टिप्पण्या कसे करू शकते?

डीएमकेचे खासदार ए राजा यांनी यापूर्वीही वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यांनी गेल्या वर्षी 6 सप्टेंबर रोजी चेन्नई येथे सनातन धर्माची तुलना एचआयव्ही आणि कुष्ठरोगाशी केली होती. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरिया आणि कोरोनाशी केली होती.

ए. राजा म्हणाले, “मलेरिया आणि डेंग्यूचा द्वेषाशी संबंध नाही किंवा त्यांना सामाजिक कलंक मानले जात नाही. आपण कुष्ठरोग आणि एचआयव्हीकडे द्वेषाने पाहतो. हा (सनातन धर्म) देखील असाच एक आजार मानला जातो. भारतात पाहायलाच हवे. एचआयव्ही आणि कुष्ठरोगासारखे सनातनलाही नष्ट करायचे आहे.

DMK leader’s controversial statement on country and religion again, A. Raja – India is not considered as a country!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात