विशेष प्रतिनिधी
डेहराडून : उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याची भाजप सरकारची तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे राज्याला समान नागरी कायद्याची दिवाळी भेट प्रत्यक्ष दिवाळीनंतर लगेच मिळणार आहे. Diwali gift of Uniform Civil Code to Uttarakhand
दिवाळीनंतरच्या पुढच्याच आठवड्यात उत्तराखंड विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवून समान नागरी कायद्याच्या संहितेवर शिक्कामोर्तब करण्याचे घाटत आहे. यासाठी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी सरकारने नेमलेली समिती मुख्यमंत्र्यांना पुढच्याच आठवड्यात अहवाल सादर करेल आणि त्यावर आधारित विधेयक विशेष अधिवेशनात मांडले जाईल.
उत्तराखंडमध्ये भाजपचे पूर्ण बहुमत असल्याने हे विधेयक ताबडतोब मंजूर करून राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याचे श्रेय पुष्कर सिंह धामी सरकारला मिळणार आहे.
त्यामुळे समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड हे गोव्यानंतरचे देशातले दुसरे राज्य ठरणार आहे. गोवा 1961 मध्ये स्वतंत्र झाल्यानंतर त्या राज्यात समान नागरी कायदा लागू झाला. गोवा सोडून इतर कोणत्याही राज्यात आज समान नागरी कायदा अस्तित्वात नाही.
पण पुष्कर सिंह धामी सरकारने समान नागरी कायद्यासाठी एक समिती नेमली आणि त्या समितीचा अहवाल तयार झाला असून तो दिवाळीनंतर लगेच मुख्यमंत्र्यांना सादर केला जाईल. त्यावर आधारित समान नागरी कायदा विधेयक तयार करून ते ताबडतोब विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मांडले जाऊन मंजूर करून त्यावर राज्यपालांची लगेच सही घेण्यात येई
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App