केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती
विशेष प्रतिनिधी
पुणे : Amit Shaha दोन महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रयत्नाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेत महाराष्ट्रासाठी 20 लाख नवीन घरे मंजूर केली होती. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुणे येथे महाआवास अभियान 2024-25 ग्रामीण टप्पा-2 मधील घरकुल मंजूर झालेल्या 20 लाख लाभार्थ्यांपैकी 5 लाभर्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात मंजुरी पत्राचे वाटप केले.Amit Shaha
प्रातिनिधिक स्वरुपात मंजुरी पत्राचे वितरण करण्यात आलेले लाभार्थींमध्ये शंकर किसन तोतरे, निर्मला शंकर तोतरे, कुरवंडी ता. आंबेगाव, शरद गजानन भारती, कमल शरद भारती, मेखळी, ता. बारामती, विराज राजेंद्र पाटोळे, नानविज, ता. दौंड, सोमनाथ महादू ठाकर, सुवर्णा सोमनाथ ठाकर, परंदवाडी, ता. मावळ, उज्ज्वला भागचंद कोळपे, भागचंद चिलाजी कोळपे, करंडेलवाडी, ता. शिरुर
तसेच केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत 10 लाख घरकुल लाभर्थ्यांना एकूण 1500 कोटींच्या प्रथम हप्त्याचे बटन दाबून वितरण केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे अध्यक्ष राम शिंदे, मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App