विशेष प्रतिनिधी
मुंबई : कर्नाटकमधील बँगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत जी घटना घडली या घटनेची निंदा करत मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
disrespected acts against chhatrapati shivaji maharaj’s name will never be tolerated ; Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे म्हणतात की, गेली कित्येक वर्षे कर्नाटकातील मराठी बांधवांवर अत्याचार केला जात आहे. शिवाजी महाराज हे आख्ख्या भारताचे दैवत आहेत. राज्यात सरकार कुणाचेही असो पण दैवते कधीही बदलली जात नाहीत. कानडी अत्याचार बंद करण्यासाठी आता पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता लवकरात लवकर राज्य सरकारला आदेश द्यावेत आणि या विकृत मनोवृत्तीचा बिमोड करावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे.
SHIVAJI MAHARAJ : पुणेकर प्रसाद तारेंनी शोधलं छत्रपती शिवाजी महाराजांच अप्रकाशित चित्र ; फ्रान्समधील सॅव्ही कलेक्शनमध्ये मौल्यवान खजिना; पहा महाराजांचे हे खास फोटो ….
पुढे ते म्हणतात की, भाजप शासित कर्नाटकात शिवाजी महाराजांची विटंबना होते आणि कुणावर कारवाई न करता उलट मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो, हे अतिशय निंदनीय आणि अवमानकारक आहे. पुढे ते म्हणतात, अख्खी मराठी अस्मितेला डिवचणे हे परवडणारे नाही, हे ध्यानात घ्यावे. केंद्र सरकारने दुतोंडी भूमिका सोडून ठोस पावले उचलावीत. भ्याड प्रकार थांबवण्याऐवजी त्याला खतपाणी घालायचे हे चालणार नाही.
छत्रपतींचा अवमान; कानडी अत्याचाराची नरेंद्र मोदींनी दखल घ्यावी : उद्धव ठाकरे https://t.co/EqfmssQD44 < येथे वाचा सविस्तर वृत्त #Karnataka #Bengaluru #ChhatrapatiShivajiMaharaj #CMUddhavThackeray #PMModi #ShivSena @OfficeofUT @ShivSena @narendramodi pic.twitter.com/MsC5dzUSJh — LoksattaLive (@LoksattaLive) December 18, 2021
छत्रपतींचा अवमान; कानडी अत्याचाराची नरेंद्र मोदींनी दखल घ्यावी : उद्धव ठाकरे https://t.co/EqfmssQD44 < येथे वाचा सविस्तर वृत्त #Karnataka #Bengaluru #ChhatrapatiShivajiMaharaj #CMUddhavThackeray #PMModi #ShivSena @OfficeofUT @ShivSena @narendramodi pic.twitter.com/MsC5dzUSJh
— LoksattaLive (@LoksattaLive) December 18, 2021
छत्रपतींचे नाव केवळ राजकारणासाठी घ्यायचे आणि आमच्या दैवतांचा अनादर झाल्यावर मात्र बोटचेपी भूमिका घ्यायची हे कदापिही खपवून घेतले जाणार नाही. असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App